आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटीसारख्या संस्थांतील शिक्षकांना पदोन्नतीसाठी गावांत शिकवावे लागेल, समस्याही सोडवाव्या लागतील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डॉक्टरप्रमाणेच आता उच्चशिक्षण संस्थांतील शिक्षकांना गावखेड्यांत जाऊन अध्यापन व तेथील प्रकल्पांवर काम करावे लागण्याची शक्यता आहे. अशा शिक्षकांना पदोन्नतीत प्राधान्यही मिळेल. यात डॉक्टरांना शिकवण्यासाेबतच गावातील अडचणींवर तोडगा काढण्याचेही काम करावे लागू शकते. तूर्त ही प्रक्रिया उन्नत भारत अभियानात समाविष्ट पाच हजार संस्थांतून सुरू होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय ही पावले उचण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. चार महिन्यांनंतर म्हणजेच आगामी शैक्षणिक सत्रापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.  उन्नत भारत हा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रकल्प असून तो विशेषत्वाने ग्रामीण भागासाठी आखण्यात आला आहे. यात आयआटी, ट्रिपल आयटी, एनआयटी, एआयसीटीई आणि यूजीसीशी संबंधित काॅलेजमधील विद्यार्थ्यांना गावांतील समस्यांवर काम करावे लागते.  विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंटर्नशिपमध्ये काही क्रेडिट गुण देण्याचीच तरतूद आहे. 

उन्नत भारत अभियानातील अधिकाऱ्यांच्या मते नवीन नियम लागू झाल्यास संस्थांतील शिक्षकवृंद गावांत काम करण्यासाठी प्रेरित होतील. उन्नत भारत अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक आणि आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर वीरेंद्रकुमार विजय म्हणाले की, सध्या २२१४ संस्थांनी सुमारे ११ हजार गावे दत्तक घेतली आहेत. मात्र त्याला ठोस यश मिळत नव्हते. अनेकदा विद्यार्थी अभ्यास आणि परीक्षेचे कारण सांगून गावांतील प्रकल्पात काम थांबवत होते.  यामुळे आता शिक्षकांनाही या अभियानात सहभागी करून घेण्याची तयारी केली जात आहे. त्यांना पदोन्नती देऊन उत्तेजन दिले जाईल. 
 

आयआयटी दिल्लीकडून सुरुवात, देशभरात ४४ केंद्रे
तीन वर्षांपूर्वी आयआयटी दिल्लीने उन्नत भारत अभियानाची सुरुवात केली होती. मात्र तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी ही योजना मंत्रालयीन पातळीवर देशभरात लागू केली. या माध्यमातून उन्नत भारताशी संबंधित संस्थांना निधीचे वाटप केले जाते. आयआयटी दिल्लीने देशभरात ४४ प्रादेशिक समन्वय केंद्रे स्थापली आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...