आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचे पगार अाता १ तारखेला हाेणार; शिक्षक अामदार किशाेर दराडे यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शिक्षकांच्या वेतनासाठी व संस्थाच्या वेतनेत्तर अनुदान दिवाळीपर्यंत मिळवून देण्याचे प्रयत्न असून यासंदर्भात मुख्यमंत्री अाणि शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार अाली अाहे. तसेच जिल्हा पातळीवर शिक्षकांचे वेतन या पुढे १ तारखेला हाेईल, अशी माहिती अामदार किशाेर दराडे यांनी दिली. तसेच १ तारखेला शिक्षकांचे वेतन करण्याबाबत काेणतेही कारण पुढे न करता काम करावे अशा सूचना दाेन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. 


माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात बुधवारी अामदार दराडे यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्याच शिक्षक दरबार झाला. या वेळी ३५० पेक्षा अधिक शिक्षकांनी अापल्या समस्या मांडल्या. या वेळी व्यासपीठावर शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, संघटक संभाजी पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, पतपेढीचे अध्यक्ष एस. डी. भिरूड, चाेपडा पंचायत समितीचे उपसभापती एम. व्ही. पाटील, वाय. पी. पाटील, हेमंत चाैधरी, अार. एल. बाविस्कर, ईश्वर सपकाळे, नंदकुमार पाटील, संजय निकम, विकास वाघ उपस्थित हाेते. 


शिक्षकांचे पगार महिन्याच्या १ तारखेलाच झाले पाहिजे यासंदर्भात अामदार दराडे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शिक्षण संस्थांना वेतनेत्तर अनुदान मिळणे अावश्यक अाहे. वेतनेत्तर अनुदानासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांच्यासाेबत चर्चा करणार अाहेे. दिवाळीपूर्वी वेतन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या शालार्थ अायडीबाबत अाढावा घेण्यात अाला. अारटीई प्रमाणपत्र वितरणातील अडचणी, अतिरिक्त शिक्षकांच्या समायाेजनाबाबत चर्चा, वैद्यकीय बिलांना तत्काळ मंजुरी द्यावी, जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित चाैकशी करणे लवकरात लवकर सुनावणी घेऊन तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात अाल्या. राधेश्याम पाटील यांनी सूत्रसंचलन केले. 


मूळ पेन्शन योजनेबाबत पाठपुरावा 
सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या अादेशान्वये मूळ पेन्शन याेजनेबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात अाले. संच मान्यतेतील त्रृटींची पूर्तता करण्यात यावी, नवीन शासन निर्णयानुसार सेवा ज्येष्ठता यादी संदर्भात निर्णय घेण्यात यावा, वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्याबाबत देखील शिक्षक दरबारामध्ये चर्चा करण्यात अाली. बैठकीत अायत्या वेळेच्या विषयांवर अाणि शिक्षकांच्या वैयक्तिक तक्रारी, प्रश्नावर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. 

बातम्या आणखी आहेत...