आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Elections 2019: 10 वी, 12 वीच्या शिक्षकांना मोठा दिलासा; बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यांना निवडणुकांचे काम नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने शिक्षकांना मोठा दिलासा आहे. 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना आता लोकसभा निवडणुकीची कामे करावी लागणार नाहीत. बोर्डाचे पेपर तपासत असताना त्यांच्यावर ताण येऊ नये हा यामागचा हेतू आहे. तत्पूर्वी शिक्षकांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुकीच्या कामांच्या ओझ्यामुळे SSC आणि HSC चे निकाल लांबतील असे कळवले होते. तसेच या कामातून मुक्तता करावी अशी विनंती केली होती. निवडणूक आयोगाने यासंदर्भात अधिकृत परीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.

 

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिक्षकांनाही कामे लावली जातात. त्यामध्ये त्यांना निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, पोलिंग बूथ अधिकारी आणि विविध जबाबदाऱ्या दिल्या जातात. 2019 च्या लोकसभेसाठी मतदानाला 11 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. 7 टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी जाहीर होतील. याच दरम्यान 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा आणि त्यांच्या पेपर तपासणीचे काम सुद्धा आहे. अशा शिक्षकांना निवडणुकीची कामे दिल्यास पेपर तपासणी, निकाल आणि परिणामी पुढील महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया या सर्वांना विलंब होऊ शकतो. शिक्षक संघटनांच्या याच मागणीचा विचार करून निवडणूक आयोगाने SSC आणि HSC बोर्डाने पेपर तपासणाऱ्यांची निवडणुकीच्या कामातून सुटका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...