आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकांचे चौथ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरूच; विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर मोठा परिमाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले प्राध्यापकांचे कामबंद आंदोलन चौथ्या दिवशीही (२८ सप्टेंबर) सुरूच राहणार आहे. मागणीबाबत ठोस आश्वासन मिळू न शकल्याने आंदोलनावर तोडगा निघू शकला नाही. चार दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू असल्याने राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर मोठा परिमाण झाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 


दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय अध्यापक संघटनेची शुक्रवारी लोणावळा येथील महाविद्यालयात बैठक आयोजित केली असून यात पुढील दिशा ठरवली जाणार आहे. प्राध्यापक महासंघातर्फे मागील दोन महिन्यांत पाच वेळा राज्यस्तरीय आंदोलने करून मागण्यांची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यभरातील २५ हजारांहून अधिक प्राध्यापक मंगळवारपासून कामबंद आंदोलन करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...