आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम अण्णाचा शनिवारपासून उत्तरांखडमध्ये प्रचार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी टीम अण्णा 21 जानेवारीपासून उत्तराखंडमधून प्रचाराला प्रारंभ करणार आहे. टीम अण्णाचे सदस्य सशक्त लोकपाल विधेयक, भ्रष्टाचार आणि जात व धार्मिक मुद्दय़ावर हरिद्वारपासून प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात येते.
टीम अण्णा डेहराडून, रुद्रापूर, अलमोरा आणि हलदवानी या शहरांमध्ये प्रचार सभा घेणार आहे. याव्यतिरिक्त टीम अण्णाचे सदस्य 24 जानेवारी रोजी र्शीनगरला भेट देणार असून 27 आणि 28 जानेवारीला अन्य राज्यातील भागाला भेट देणार आहेत. माजी आयआरएस अधिकारी अरविंद केजरीवाल, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि कुमार विश्वास हे प्रचार सभांमध्ये भाग घेणार आहेत. टीम अण्णा विधानसभा निवडणूक होणार्‍या पाचही राज्यांना भेट देणार असल्याची माहिती मनीष सिसोदिया यांनी सांगितले. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षांविरुद्ध प्रचार करणार नाही, असे सिसोदिया म्हणाले.