आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात कमकुवत अफगाणविरुद्ध बलाढ्य भारताचा कठीण विजय; वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा सुरुवातीच्या ५ सामन्यांत विजयी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथम्पटन - काेहली (६७) व केदार जाधव (५२) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर माे. शमीच्या (४/४०) शानदार गाेलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने शनिवारी विश्वचषकात चाैथा विजय नाेंदवला. भारताने स्पर्धेतील आपल्या पाचव्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. टीम इंडियाने ११ धावांनी राेमहर्षक विजय मिळवला. यासह भारताने विश्वचषकात  विजयाचे अर्धशतक साजरे केले. भारताचा हा ५० वा विजय ठरला. तसेच अफगाणचा हा सलग सहावा पराभव ठरला.  भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकात सुरुवातीचे पाच सामने गमावले नाही. यापुर्वी, २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये भारताने सुरुवातीचे ५ सामने जिंकले हाेते. आता पाचपैकी भारताचे चार सामने जिंकले. एक सामना पावसामुळे रद्द झाला.


भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ गड्यांच्या माेबदल्यात २२४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानला ४९.५ षटकांत २१३ धावांत  गाशा गुंडाळावा लागला.  नबीची (५२) झुंज व्यर्थ ठरली. नऊ वर्षांनंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना ५० षटके खेळूनही २२५ धावा काढू शकला नाही. यापूर्वी २०१० मध्ये  टीम इंडियाने  झिम्बाब्वे संघाविरुद्ध ९ बाद १९४ धावा काढल्या हाेत्या.

 

शमीची हॅट‌्ट्रिक : भारताच्या  शमीने यंदा विश्वचषकात पहिली हॅट‌्ट्रिक नाेंदवली. त्याने अफगाणिस्तान संघाविरुद्ध सामन्याच्या शेवटच्या षटकांत विकेटची हॅट‌्ट्रिक केली. त्याने सामन्यात ४ बळी घेतले.

 

पहिल्या तीन सामन्यांत फिरकीपटूंची निराशा; आता एकाच मॅचमध्ये पाच विकेट 

सुरुवातीच्या तीन सामन्यांत भारताच्या फलंदाजांनी शानदार खेळी केली. यांनी ५३ षटकांत ३३९ धावा काढल्या. म्हणजे प्रत्येक षटकात ६.३९ धावांची नाेंद झाली. विकेट राखून ही खेळी करता अाली. मात्र, अाता अफगाणिस्तान संघाविरुद्ध सामन्यात भारताच्या सुमार फलंदाजीचे चित्र पाहायला मिळाले. भारताच्या फलंदाजांनी ३४ षटकांत ११९ धावा काढल्या. म्हणजे  प्रत्येक षटकात ३.५० धावा निघाल्या. पाच फलंदाज बाद झाले.

 

काेहलीचे अर्धशतक : भारताकडून सध्या फाॅर्मात असलेल्या कर्णधार विराट काेहलीने शानदार अर्धशतक ठाेकले. त्याचे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये तिसरे अर्धशतक साजरे केेले. त्याने प्रत्येक षटकात ६.३८ धावा काढल्या. यासह त्याला ६७ धावांची खेळी करता अाली. दुसरीकडे इतर फलंदाजांनी २३७ चेंडूंचा सामना करताना १५० धावांची कमाई केली. म्हणजे प्रत्येक षटकात ३.७९ धावांची नाेंद झाली. 

 

डेटा पॉइंट

> मुजीबने १० षटकांत २६ धावा दिल्या. त्याचा इकाॅनाॅमी २.६ अाहे. ही वर्ल्डकपमध्ये स्पिनरची दुसरी सर्वाेत्तम कामगिरी नाेंद. मॅक्लुमने २०११ मध्ये बांगलादेशविरुद्ध १० षटकांत २४ धावा.   


> टीम इंडियाला सुरुवातीच्या १० षटकांत चार बाउंड्री. ही विश्वचषकात काेणत्याही टीमकडून झालेली चाैथी सर्वात सुमार खेळी ठरली. 

 

वर्ल्डकपमधील आतापर्यंतच्या १० हॅट‌्ट्रिक

चेतन शर्मा - न्यूझीलंड    1987
सकलेन - झिम्बाब्वे    1999
वास - बांगलादेश    2003
ब्रेट ली - केनिया    2003
मलिंगाद.- आफ्रिका    2007
केमार - रोचहाॅलंड    2011
मलिंगा - केनिया    2011
फिन - ऑस्ट्रेलिया    2015
ड्युमिनी - श्रीलंका    2015 
शमी - अफगाणिस्तान    2019
 

 

HOWZATT

टीम इंडिया

 

> रोहित: मुजीबचा चेंडू आॅफ स्टम्पच्या रेषेत वेगाने आला.  फ्रंटफूटवर बचाव. चेंडूने बॅट-पॅडदरम्यान निघून थेट त्रिफळावर.

 

> राहुल:   रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. मिसटाइम झाल्याने शॉर्ट थर्डमॅनच्या हाती झेल दिला.  

>  शंकर:  चांगली उंची असल्याने  उत्कृष्ट स्वीप खेळू शकत नाही तरीदेखील स्वीपचा प्रयत्न केला.

> विराट:  कटचा प्रयत्न केला.  चेंडूने  अतिरिक्त उसळी घेतली. तो पॉइंटवर झेलबाद झाला.

> धोनी:  राशिदच्या चेंडूवर पुढे येऊन मोठा शॉट मारण्याच्या नादात बाद झाला.

> हार्दिक: बााउन्सरला  मारण्याचा प्रयत्न.  बॅटचा कट. यष्टिरक्षकाने त्याचा झेल घेतला.

> शमी:  डेथ ओव्हर्समध्ये नईबचा संथ चेंडूला मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला.


>: जाधव:  संथ चेंडूला ओळखू शकला नाही. इनर सर्कलवरून मारण्याच्या नादात वेळ चुकवली. 

 

अफगाणिस्तान

> झाजई: शमीच्या चेंडूवर हिटचा प्रयत्न. अपयशी; साधा फटका मारून चेंडूला शमीच्या हातात साेपवले.

> नइब: हार्दिकचा चेंडू, बॅटला लागला. धावासाठी पळला. मिडविकेटवर शंकरने झेल घेतला.

> रहमत: बाउंसरला हिटचा प्रयत्न केला. बॅटच्या टाॅप एजला लागला. चहलने फाइन लेगवर झेल घेतला.

 > शाहिदी: शॉर्ट बॉल, बॅटला लागल्याने बुमराहने घेतला झेल. 

> असगर: डीप मिडविकेटकडे माेठा फटका हुकला, झाला बाेल्ड

> नजीबुल्लाह: आॅफ कटर चेंडू.मिडविकेटवर चहलकडे झेल.

> राशिद: बॅटचा बाहेरचा भाग लागला. धाेनीकडून यष्टीचीत.

> नबी: शमीच्या याॅर्करवर शाॅट. लाॅग्नअाॅनवर हार्दिककडे झेल. 

> आलम: यॉर्करला स्वीपचा प्रयत्न केला व त्रिफळाचीत झाला.

> मुजीब: सलग तिसरा याॅर्कर. चेंडू लेग स्टंम्प लागुन त्रिफळाचीत.

बातम्या आणखी आहेत...