आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाने २२ महिन्यांत ३३ वेळा उडवला प्रतिस्पर्धी टीमचा धुव्वा; झाली सर्वाधिकची नाेंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राेखण्याच्या प्रयत्नात राेहित पडला - Divya Marathi
राेखण्याच्या प्रयत्नात राेहित पडला

पुणे - यजमान भारतीय संघाने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवताना प्रतिस्पर्धी टीमचा धुव्वा उडवण्याचा पराक्रम गाजवला. भारताने दुसऱ्या कसाेटीच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या डावात खुर्दा उडवला. अश्विनच्या शानदार गाेलंदाजीमुळे दमछाक झालेल्या आफ्रिकेला आपला पहिला डाव अवघ्या २७५ धावांवर गुंडाळावा लागला. आफ्रिका संघाकडून केशव महाराजने (७२) करिअरमधील सर्वाेत्तम खेळी केली. त्यामुळे आफ्रिकेला २०० धावांचा आकडा पार करता आला. त्याचे कसाेटीतील पहिले अर्धशतक ठरले. भारताने २२ महिन्यात सर्वाधिक ३३ वेळा प्रतिस्पर्धी टीमला आॅलआऊट करण्याचा पराक्रम गाजवला आहे. ही भारतीय संघाच्या नावे विक्रमाची नाेंद झाली. भारतीय संघाने १ जानेवारी २०१८ पासून आजतागत ही कामगिरी करून दाखवली आहे. भारताकडून आता अश्विनने आता चार बळी घेतले. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विकेटचे अर्धशतक साजरे केले. असे करणारा ताे चाैथा भारतीय गाेलंदाजी ठरला आहे.