आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपदरम्यान पत्नीसोबत‍ राहू द्या; भारतीय क्रिकेटपटूंची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी सात महिने शिल्लक आहेत. त्यासाठी भारतीय संघाची तयारी सुरू आहे. अशातच संघाने भारतीच क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळाच्या प्रशासक समितीकडे (सीओए) काही मागण्या केल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेदरम्यान क्रिकेटपटूंना पत्नीसोबत राहाण्याची परवानगी द्यावी, ही प्रमुख मागणी हैदराबादमध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत करण्‍यात आली आहे.

 

इंग्लंडमध्ये रेल्वेने प्रवास करण्याची सूट द्यावी, तसेच इतर फळांसह नाश्त्यात केळीची व्यवस्था करावी, अशा मागण्या सीओएकडे करण्यात आल्या आहेत.

 

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पार पडली आढावा बैठक...

> काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाने  इंग्लंड दौऱ्याची सुरूवात टी -20 मालिका जिंकून केली होती. परंतु त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिका गमावली. त्याच दौऱ्याच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथे एक आढावा बैठक पार पडली.

 

> या बैठकीसाठी कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मुख्य निवड समितीचे एमएसके प्रसाद उपस्थित होते. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, संघाने फळांमध्ये केळीची मागणी केल्याने सीओए सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

 

> वृत्तानुसार, "इंग्लंड क्रिकेट बोर्ड हे दौऱ्यादरम्यान भारतीय संघाला त्यांच्या आवडीचे फळ उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले होते. सीओएने सांगितले की, बीसीसीआयच्या खर्चात केळे खरेदी करण्यासाठी संघ व्यवस्थापकाला माहिती द्यायला हवी होती.

 

> भारतीय संघाने एक व्यवस्थित जिम असलेले हॉटेल क्रिकेटपटूंच्या निवासस्थानासाठी बुक करण्याचे सीओएला सांगितले आहे. याशिवाय, विश्वचषकादरम्यान क्रिकेटपटूंच्या पत्नींना सोबत ठेवण्याच्या प्रोटोकॉलवर चर्चा करण्‍यात आली.


> सीओएने भारतीय संघाला सांगितले की, निर्णय घेण्यापूर्वी संघातील सर्व सदस्यांकडून लिखित संमती घेण्यात येईल. सीओए सदस्य डायना एडुलजी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, या प्रकरणात त्वरित निर्णय घेण्यात येणार नाही.  


> विश्वचषकादरम्यान क्रिकेटपटूंना रेल्नेने प्रवास करण्याची परवानगी देण्याच्या मागणीवर प्रशासकीय समिती आश्चर्यचकित झाली. तथापि, तसे करणे सुरक्षित राहील आणि वेळही वाचेल असा युक्तिवाद संघाने केला आहे. 

 

> इंग्लंडमध्ये क्रिकेटपटूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने सीओएने सुरूवातीला रेल्वेने प्रवासाची सहमती दर्शविली नाही. मात्र, यावर कोहलीने सांगितले की, इंग्लंड संघ रेल्वेनेच प्रवास करतो. त्यांच्यासोबतच भारतीय संघासाठी रेल्वेचा एक कक्ष आरक्षित करावा, अशीही कोहलीने मत मांडले.

 

> या दरम्यान काहीही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासक समिती किंवा बीसीसीआय त्यासाठी जबाबदार राहणार नसल्याचे सीओएने सांगितले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...