आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड कपची तयारी सुरू असताना चहलसोबत PUBG खेळताना दिसला धोनी, सोशल मीडियावर आल्या अशा प्रतिक्रिया...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी टीम इंडिया इंग्लंडला रवाना झाली आहे. भारतीय संघाच्या सदस्यांनी यासाठी मुंबई विमानतळावरून उड्डान घेतले. तत्पूर्वी टीम इंडियाचे खेळाडू विमानतळावर रिलॅक्स करताना दिसून आले. त्यामध्ये एमएस धोनी आणि इतर टीम मेंबर्सचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये धोनी युजवेंद्र चहलसोबत चक्क PUBG खेळताना दिसून आला. त्यांच्या या फोटोवर फॅन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Jet set to go ✈✈ #CWC19 #TeamIndia

A post shared by Team India (@indiancricketteam) on

 

टीम इंडियाचा रिलॅक्स मूडमधले हे फोटो इंस्टाग्रामवर इंडियन क्रिकेट टीमच्या अधिकृत पेजने शेअर केले. यावर फॅन्सने एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. काहींनी आपल्या देशाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तर काहींनी पबजी खेळण्यावरून टीका केली. एकाने तर मोबाईल सोडा आणि क्रिकेटवर लक्ष द्या, यंदा आम्हाला वर्ल्ड कप हवा आहे असे लिहिले. वर्ल्ड कपमध्ये 1992 नंतर प्रथमच राउंड रॉबिन सिस्टिम अवलंबली जात आहे. यामध्ये प्रत्येक टीमला प्रत्येक टीमसोबत खेळण्याची संधी मिळेल. विश्वचषकाची सुरुवात 30 मे रोजी होणार आहे. यात भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. यानंतर भारतीय संघ 9 जून रोजी ऑस्ट्रेलिया, 13 जून रोजी न्यूझीलंड आणि 16 जून रोजी पाकिस्तानशी भिडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...