आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Team India Has A Chance To Win The Fourth Odi Series Against The Windies

विंडीजविरुद्ध सलग चाैथी मालिका जिंकण्याची टीम इंडियाला आज संधी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सामन्याच्या पूर्वसंध्येला बीचवर राेहितसह नवदीप, अहमद अाणि मयंक.

 पाेर्ट ऑफ स्पेन - दुसऱ्या सामन्यातील विजयाने भारतीय संघ जबरदस्त फाॅर्मात आहे. आता हीच लय कायम ठेवताना यजमान विंडीजविरुद्ध सलग चाैथी द्विपक्ष मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. भारत - विंडीज यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज ब ुधवारी रंगणार आहे. भारताने वनडेतील विजयासह मालिकेत १-० ने आघाडी  घेतली. आता  मालिका विजयापासून भारताचा संघ एका पावलावर आहे. भारताने गत आठवड्यात विंडीजविरुद्धची टी-२० मालिकाही ३-० ने जिंकली आहे. आता पाठाेपाठ वनडे मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. भारत आणि यजमान विंडीज यांच्यातील विंडीजच्या मैदानावर आयाेजित ९ वी मालिका आहे. आतापर्यंतच्या आठ मालिकांपैकी दाेन्ही संघांनी प्रत्येकी चार जिंकल्या आहेत. भारताकडून आतापर्यंत शिखर धवनला समाधानकारक खेळी करता आली नाही. त्याने चार सामन्यांत अवघ्या २९ धावांचे याेगदान दिले. ताे सलामीवीराच्या भूमिकेत  छाप पाडू शकला नाही. त्याने तीन टी-२० सामन्यांत १, २३ व ३ धावांची  खेळी केली. तर, दुसऱ्या वनडेत ताे २ धावांवर बाद झाला ़

श्रेयसला चाैथ्या स्थानी संधी : भारतीय संघ तिसऱ्या वनडे सामन्यात चाैथ्या स्थानावरील फलंदाजीसाठी युवा खेळाडू श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे.  ऋषभ सपशेल अपयशी ठरला आहे. ताे या स्थानी अव्वल खेळी  करून स्वत:ला सिद्ध करू शकला नाही.