आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Team India Has The Chance To Win The Cricket Series For The First Time!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाकडे प्रथमच ऑस्ट्रेलियात कसाेटी मालिका जिंकण्याची संधी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- मेलबर्न कसाेटीतील विजयाने फाॅर्मात आलेला भारतीय संघ आता दाैऱ्यात यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाला आता प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये कसाेटी मालिका आणि तीन कसाेटी जिंकण्याची संधी आहे. भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथ्या कसाेटीला उद्या गुरुवारपासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात हाेत आहे. दाेन विजयांच्या बळावर भारताने चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेमध्ये २-१ ने आघाडी घेतली. त्यामुळे आता तिसऱ्या विजयाने भारताला ही कसाेटी मालिका आपल्या नावे करता येईल. यातून भारताच्या नावे पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील मालिकेमध्ये तीन कसाेटी जिंकण्याचा पराक्रमही नाेंद हाेईल. याच अव्वल कामगिरीसाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. आता या कसाेटीमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. 

या चाैथ्या कसाेटीसाठी आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात येईल. तिसऱ्या कसाेटीत सहाव्या स्थानावर फलंदाजी करणाऱ्या राेहितला साेमवारी कन्यारत्न झाले. त्यामुळे ताे आता मायदेशी परतला आहे. यातून त्याला चाैथ्या कसाेटीत सहभागी हाेता येणार नाही. दुसरीकडे आर. अश्विन हा दुखापतीमधून पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळेच त्याने सरावादरम्यान सहभाग घेतला हाेता. यातूनच पूर्णपणे फिट असल्याने त्याला राेहितच्या जागी खेळण्याची संधी मिळण्याचे चित्र आहे. त्यामुळे सिडनीच्या खेळपट‌्टीच्या अभ्यासावरून प्लेइंग इलेव्हनमध्ये दाेन फिरकीपटूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. सिडनी येथील खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी सहायक मानली जाते. त्यामुळेच अश्विनचा सहभाग निश्चित मानला जाताे. यातून निश्चितपणे टीमचा विजयाचा मार्ग सुकर हाेणार आहे.

 

संभाव्य संघ 
भारत : विराट काेहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, माे. शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह 
ऑस्ट्रेलिया : पैन (कर्णधार), हॅरिस, फिंच, ख्वाजा, शाॅन मार्श, हेड, मार्नस लाबुशेन, कमिन्स, स्टार्क, नॅथन, जाेश हेझलवुड. 

 

एमसीजीच्या खेळपट्टीवर आयसीसीची नाराजी 
आयसीसीने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसाेटी मेलबर्न येथे झाली. मात्र, येथील मैदानावरची खेळपट‌्टी अत्यंत सुमार असल्याची नाराजी आयसीसीने व्यक्त केली. त्यामुळेच या पीचला आयसीसीने अॅव्हरेेज रेटिंग दिली आहे. त्यामुळे ही रेटिंग सर्वात कमी मानली जाते. याच पीचवर २०१७ मध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात कसाेटी सामना झाला हाेता. त्यादरम्यानही आयसीसीने ही खेळपट‌्टी सुमार असल्याचा ठपका ठेवला हेता.

 

मार्नस लाबुशेनला संधी; मिशेल मार्शला मिळेल विश्रांती 
ऑस्ट्रेलिया संघानेही आता चाैथ्या कसाेटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे लेग स्पिनर ऑलराउंडर मार्नस लाबुशेनचा प्रवेश जवळपास निश्चित मानला जाताे. त्यामुळे अॅराेन फिंच आणि मिशेल मार्श या दाैघांपैकी एकाला विश्रांती देण्यात येईल. अशात ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची फिंचला खेळवण्यास पहिली पसंती आहे. 

 

विकेटकिपर ऋषभ बनला बेबी सीटर 
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पैन हा ऋषभ पंतसाेबत स्लेजिंग करताना घरी येऊन बेबी सीटिंगचे काम कर, असे म्हणाला हाेता. त्यानंतर ऋषभने त्याची पत्नी आणि मुलांची भेट घेतली. याच भेटीचा फाेटाेही त्याने शेअर केला.