आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Team India Leaving For England Today; Virat Kohli, Ravi Shastri Press Conference Before Leaving For The ICC World Cup

WorldCup2019 / इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी कोहली आणि शास्त्रींनी घेतली पत्रकार परिषद, शास्त्री म्हणाले- संघात कोणताच बदल नाही, केदार जाधव फीट आहे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला निघण्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्रीने मंगळवारी(21मे) पत्रकार परिषद घेतली. यात कोहली म्हणाला की, इंग्लंडच्या वातावरणाला झेलण्यापेक्षा विश्वचषकाच्या दबावाला झेलने महत्त्वाचे आहे. शास्त्री म्हणाले- महेंद्र सिंह धोनीचा टूर्नामेंटमध्ये महत्त्वाचा रोल असेल. विशेषकरून काही लहाल-लहान मॅच पलटवणाऱ्या संधीकडे लक्ष द्यावे लागेल. भारतीय टीम बुधवारी सकाळी 4 वाजता इंग्लंडसाठी रवाना होईल.


शास्त्रींनी साई बाबाचे दर्शन घेतले
इंग्लडला रवाना पोहण्यापूर्वी शास्त्री आणि फील्डिंग कोच आर. श्रीधरने शिर्डीमध्ये साई बाबांचे दर्शन घेतले. इंग्लंड अँड वेल्समध्ये 30 मे पासून 14 जुलैपर्यंत विश्वचषक खेळला जाईल. भारतीय टीम 25 मे रोजी न्यूजीलंड आणि 28 मे रोजी बांग्लादेशसोबत अभ्यास मॅच खेळेल. टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण अफ्रीकेसोबत होईल.

 

भारतीय टीममध्ये कोणताच बदल नाही, केदार जाधव फिट
बीसीसीआयने 17 एप्रिलला वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय टीमची घोषणा केली होती. यानंतर इतर संघांनीही आपल्या टीमची घोषणा केली. यात पाकिस्तान, इंग्लंडसहित अनेक संघात बदल करण्यात आले. पण, भारतीय टीममध्ये कोणताच बदल करण्यात आला नाही. केदार जाधव आयपीएलमध्ये जखमी झाला होता, पण आता तो फीट आहे.


वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम-

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उप-कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी.

बातम्या आणखी आहेत...