आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडीज दाैऱ्यासाठी टीम इंडियाने वनडेत पाच खेळाडूंमध्ये केला बदल; दाेन वर्षांत सर्वात कमी खेळाडू बदलले, त्याच संघांनी जिंकले सर्वाधिक सामने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी विंडीज दाैऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घाेषणा करण्यात आली. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघात पाच माेठे बदल करण्यात आले. सुमार खेळी करणाऱ्या खेळाडूंना बाहेर करण्यात आले आहे, तर काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.  या दाैऱ्याच्या माध्यमातून खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याचा यामागे हेतू आहे. त्यासाठी नव्या चेहऱ्यांना या दाैऱ्यात संधी मिळाली. यात मनीष पांडेसह श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनीचा समावेश आहे. कसाेटीसाठी आर.अश्विन आणि वृद्धिमान साहाला वर्षभरानंतर भारतीय संघात संधी मिळाली आहे. तसेच टी-२०च्या फाॅरमॅटसाठी युवा गाेलंदाज राहुल चाहरची निवड करण्यात आली.  भारतीय संघाचा या दाैऱ्यात तिन्ही मालिका आपल्या नावे करण्याचा दावा मजबूत मानला जाताे. गत दाेन वर्षांत ज्या संघांनी सर्वाधिक कमी खेळाडूंचा बदल केला, त्या संघाच्या विजयाची टक्केवारी माेठी ठरली आहे.


वनडेत इंग्लंड, न्यूझीलंडकडून सर्वात कमी बदल
गत दाेन वर्षांतील वनडत खेळाडू बदलाची आकडेवारी पाहिली असता, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघांनी सर्वात कमी वेळा बदल केला आहे. न्यूझीलंडने २२ आणि न्यूझीलंडने २५ खेळाडूंना संधी दिली. याचा झालेला फायदा नुकताच या दाेन्ही संघांना विश्वचषकादरम्यान दिसून आला. या दाेन्ही संघांच्या विजयाची टक्केवारीही सर्वाधिक  ठरली आहे. श्रीलंका आणि विंडीजने अनुक्रमे ४४ व ३७ खेळाडूंना मैदानावर उतरवले. तर , टीम इंडियाने ३० खेळाडूंना संधी दिली. 


युवा गाेलंदाजांची विंडीजविरुद्ध सरस कामगिरी; भारत अ ८ गड्यांनी विजयी
भारताच्या अ संघातील युवा गाेलंदाजांनी विंडीज दाैऱ्यातील अनधिकृत पाच वनडे  सामन्यांच्या मालिकेत सरस खेळी केली. त्यामुळेच भारताला शेवटच्या पाचव्या वनडेत आठ गड्यांनी विजयाची नाेंद करता आली. अय्यरने अर्धशतकाचे याेगदान दिले. मालिकेत श्रेयस अय्यरने ६२ च्या सरासरीने १८७  धावा काढल्या. वेगवान गाेलंदाज खलील अहमदने ९ आणि नवदीप सैनीने ८ विकेट घेतल्या.   स्पिनर कृणालने ७ आणि राहुल चाहरने ६ बळी घेतले. या दाेन्ही स्पिनरला  टी-२० संघात स्थान मिळाले आहे.  

 

टी-२० विश्वचषकापर्यंत धाेनी भारतीय संघात
पुढच्या वर्षी २०२० टी-२० विश्वचषक स्पर्धा आॅस्ट्रेलियात हाेणार आहे. आॅक्टाेबर-नाेव्हेंबरदरम्यान याचे आयाेजन करण्यात आले. या विश्वचषकापर्यंत महेंद्रसिंग धाेनी हा भारतीय संघात कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता त्याने दाेन महिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. दाेन महिन्यांनी बीसीसीआयची निवडणूक हाेणार आहे. त्यामुळे मंडळात पूर्णपणे बदल हाेईल. यादरम्यान माजी अध्यक्ष शशांक मनाेहर यांच्या गटाचा उमेदवार निवडून आल्यास धाेनीला फायदा हाेईल. त्यामुळेच सध्या तरी धाेनी निवृत्तीच्या विचारात नाही.