आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाने चाैथ्यांदा 200+ धावांचे लक्ष्य गाठले; सर्वाधिकची झाली नाेंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1-0 ने भारताची मालिकेत आघाडी; श्रेयसचे अर्धशतक
  • न्यूझीलंडवर 6 गड्यांनी विजयी सलामी, याच मैदानावर उद्या रविवारी सामना
  • भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर ठरला सामनावीराचा मानकरी
  • म्रुनाे (59), विलियम्सन (51), टेलर (नाबाद 54), राहुल (56) व श्रेयस अय्यर (नाबाद 58) यांची शानदार अर्धशतके साजरी

​​​​ऑकलंड : टीम इंडियाने माेठ्या आणि खडतर लक्ष्याच्या प्रत्युत्तरातही धाडसाने विजयश्री खेचून आणण्याची क्षमता असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. भारतीय संघाने चाैथ्यांदा २०० + धावांचे खडतर लक्ष्य चाैथ्यांदा गाठले. युवा फलंदाज श्रेयस अय्यर (नाबाद ५८) आणि तुफानी फटकेबाजीच्या बळावर भारताने शुक्रवारी सलामीच्या टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने ६ गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता दुसरा सामना उद्या याच मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध सर्वात माेठे टार्गेट गाठून हा सर्वात माेठा विजय नाेंदवला. या मैदानावर भारताने गतवर्षी १५९ धावांचे लक्ष्य गाठले हाेते.

यजमान न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमाेर विजयासाठी २०४ धावांचे टार्गेट ठेवले. भारताने १९ षटकांत चार गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून आणली. लाेकेश राहुल आणि श्रेयस अय्यरने विजय निश्चित केला. यासह भारताने न्यूझीलंडच्या मैदानावर दुसरा विजय नाेंदवला. यापूर्वी गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडमध्ये विजय मिळवला.

विंडीजविरुद्ध प्रत्युत्तरात भारताने गाठले माेठे लक्ष्य

भारतीय संघाने आपल्या करिअरमध्ये विंडीज संघाविरुद्ध सर्वात माेठ्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात विजयाला गवसणी घातली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी दाेन वेळा यश गाठले.

लक्ष्य - विरुद्ध - वर्ष - मैदान


208 - वेस्ट इंडीज - 2019 - हैदराबाद
207 - श्रीलंका - 2009 - मोहाली
204 - न्यूझीलंड - 2020 - ऑकलंड
202 - ऑस्ट्रेलिया - 2013 - राजकोट

राहुल-काेहलीची ९९ धावांची भागीदारी

भारतीय संघाकडून प्रत्युत्तरात लाेकेश राहुल आणि काेहलीने दमदार खेळी केली. या दाेघांनी न्यूझीलंडच्या सुमार गाेलंदाजीचा समाचार घेताना दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची महत्त्वाची भागीदारी नाेंदवली. राेहित शर्मा (७) स्वस्तात बाद झाल्यानंतर या दाेघांनी संघाचा डाव सावरला. राहुल (५६) हा टीमचा स्काेअर ११५ असताना बाद झाला. काेहली ४५ धावांचे याेगदान देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर श्रेयस अय्यरने आपला सहकारी मनीष पांडेसाेबत पाचव्या विकेटसाठी अभेद्य ६२ धावांची भागीदारी रचली.

  • घरच्या मैदानावर खेळत असल्यासारखेच वाटत हाेते. या ठिकाणी आम्हाला ८० टक्के चाहत्यांचे पाठबळ लाभले. त्यामुळे लक्ष्य गाठण्यासाठीचा आत्मविश्वास अधिक बळावला हाेता. - विराट कोहली, कर्णधार, भारतीय संघ.
  • भारतीय संघाने सरस फलंदाजीच्या बळावर विजयाची नाेंद केली. आम्ही गाेलंदाजीतून संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत हाेताे. मात्र, यात आम्ही अयपशी ठरलाे. - केन विलियम्सन, कर्णधार, न्यूझीलंड संघ.

टी-२० : टेलरचे सहा वर्षांनंतर अर्धशतक

न्यूझीलंडच्या गुप्टिल आणि म्रुनाेने पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी नाेंदवली. विलियम्सन (५१) आणि टेलरने (नाबाद ५४) चाैथ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी केली. तसेच टेलरने सहा वर्षांनंतर टी-२० मध्ये अर्धशतकाची नाेंद केली. त्याने २०१४ मध्ये आफ्रिकेविरुद्ध ६२ धावांची खेळी केली हाेती.

विलियम्सची धाेनीवर मात

न्यूझीलंडच्या कर्णधार विलियम्सनने धाेनीचा टी-२० मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम ब्रेक केला. अाता त्याच्या ३० धावा नाेंद झाल्या.

न्यूझीलंडमध्ये दुसरे माेठे लक्ष्य

भारताला न्यूझीलंडमध्ये दुसऱ्या माेठ्या लक्ष्याला समाेरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये ऑकलंड येथे २४३ धावांचे लक्ष्य सहज गाठले.

भारताचा आठव्यांदा दुसऱ्या डावात २००+ स्काेअर

भारताने टी-२० च्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आठव्यांदा दुसऱ्या डावात २००+ धावांचा स्काेअर नाेंद केला. इंग्लंडने चार, ऑस्ट्रेलियाने तीन आणि दक्षिण आफ्रिका, विंडीजने प्रत्येकी दाेन वेळा असा पराक्रम गाजवला आहे.