आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पोर्ट डेस्क- भारत-आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथ्या कसाेटीचे दाेन दिवस शिल्लक आहेत. सुमार खेळीमुळे आता यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघावर फाॅलाेऑनचे सावट आहे. तसेच या अडचणीतून सुटका करण्यासाठी यजमानांसमाेर दाेनच माेठे पर्याय आहेत. यात पहिले म्हणजे टीमच्या खेळाडूंनी उल्लेखनिय खेळी करावी. तर, दुसरे म्हणजे पावसाची कृपा व्हावी. मात्र, असे असतानाही तिसऱ्या दिवसाच्या अव्वल कामगिरीमुळे टीम इंडियाने आपला विजयाचा दावा मजबूत केला आहे. त्यामुळे आता भारताचा पराभव हाेणे अशक्य मानले जाते. यासह भारताने आता ऑस्ट्रेलियात पहिल्या मालिका विजयाचा आपला दावा मजबूत केला. याच ऐतिहासिक विजयाच्या जल्लाेषाकडे आता सर्वांचे लक्ष लागले. ऑस्ट्रेलियातील भारताचा हा मालिका विजय म्हणजे १९७१ मधील विंडीज आणि २००४ मध्ये पाकविरुद्ध मिळवलेल्या विजयाच्या बराेबरीत असेल.
स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वाॅर्नरच्या अनुपस्थितीमुळे यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ दुबळा मानला जाताे. मात्र,असे म्हणून टीम इंडियाकडून विजयाचे श्रेय काढून घेता येणार नाही. हा मालिका विजय ७१ वर्षांनंतर मिळत आहे. ज्याचे महत्त्व भारतीय क्रिकेटसाठी अधिक प्रभावशाली असेल.
भारताचा संघ सध्या मजबूत आहे. त्यामुळेच सर्वच अंगाने टीम इंडियाला या मालिकेत आपल्या अव्वल कामगिरीने छाप पाडता आली. गाेलंदाजीपाठाेपाठ संघाच्या खेळाडूंनी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही आपले कसब दाखवले. भारताची गाेलंदाजी गत दशकापासून अधिक आक्रमक झालेली दिसते. या टीममध्ये २० विकेट घेण्याची क्षमता असल्याचे सिद्ध झाले. याचाच प्रत्यय आफ्रिका आणि इंग्लंड दाैऱ्यातही आला हाेता. मात्र, येथे फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. त्यामुळेच लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. हीच उणीव भरून काढण्यासाठी आता ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात चेतेश्वर पुजारा, काेहलीने आपल्या फलंदाजीचा दर्जा उंचावला. पुजाराने यजमानांची गाेलंदाजी फाेडून काढताना मालिकेत तीन शतके साजरी केली. यासह त्याने ५२१ धावा काढल्या आहेत. अशा प्रकारचे याेगदान १९७१ मध्ये विंडीज मालिकेतील विजया दरम्यान सुनील गावसकर आणि दिलीप सरदेसाईचे, १९८६ मध्ये इंग्लंड येथे दिलीप वेंगसरकर आणि २००४ मध्ये पाकमध्ये सेहवाग-द्रविडने दिलेे हाेते. बुमराह हा आघाडीचा गुणी खेळाडू आहे. त्याची अॅक्शन, वेग व कंट्राेलची शैली वाॅर्नर-स्मिथचीही परीक्षा घेण्यासाठी सक्षम मानली जाते. हेही त्याने वेळाेवेळी दाखवून दिले. फलंदाजीमध्ये काेहली, रहाणे, ऋषभ पंत, मयंक ,हनुमाने आणि गाेलंदाजीमध्ये शमी, ईशांत, पंत,अश्विन, जडेजा व कुलदीपने आपापली क्षमताही सिद्ध केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.