आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर भारतीय संघ भगव्या रंगात अवतरणार, बीसीसीआयने ट्विटरवरून नव्या जर्सीचा फोटो शेअर केला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय संघ इंग्लंडसोबत होणाऱ्या सामन्यात भगव्या जर्सीत अवतरनार आहे. बीसीसीआयने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यासोबतच नव्या जर्सीचा फोटोही शेअर केला आहे. मागील अनेक दिवसांपासून या जर्सीची चर्चा होती. अखेर टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भगव्या जर्सीत खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे.भारतीय संघ भगव्या जर्सीत खेळणार असल्याची चर्चा रंगताच याला राजकीय रंगही देण्यात आला. तर काहींनी याचे समर्थनही केले. भारतीय संघाची नवी जर्सी भगव्या रंगात आहे. या जर्सीच्या मागील बाजूस पूर्णपणे भगवा रंग आहे.


भारताचा पुढील सामना 30 जूनला इंग्लंडसोबत होईल, त्यानंतर 2 जुलैला भारत विरूद्ध बांगलादेश आणि 6 जुलैला भारत विरूद्ध श्रीलंका सामना रंगणार आहे. गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताला पहिल्या स्थानावर जाण्याची संधी आहे. अंतिम सामन्यानंतर भारत पहिल्या स्थानी असल्यास चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघासोबत भारताचा सेमीफायनल होईल.

 

 

भारताने नुकतेच वेस्ट इंडिजला पराभूत केले. या सामन्यातच टीम इंडिया भगव्या जर्सीत उतरणार असल्याचे बोलले जात होते. वेस्ट इंडिजला 143 (34.2) धावांवर रोखण्यात भारताला यश आले. भारतीय गोलंदाजीची धार यावेळीही पाहायला मिळाली. गेल्या सामन्यात मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेऊन भारताला अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला, तर या सामन्यात बुमराने सलग दोन विकेट घेऊन विंडीजचे कंबरडे मोडले. स्फोटक फलंदाज ख्रिस गेल स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उर्वरित फलंदाजांनाही खेळपट्टीवर फार काळ टिकू दिलं नाही. हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव प्रत्येकी एक, तर यजुवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या.