Cricket / टीम इंडियाचा मालिका विजय, मालिकेत २-० ने विजयी आघाडी; उद्या तिसरा व शेवटचा सामना गयानामध्ये

पावसाचा व्यत्यय; २२ धावांनी विंडीजवर मात

दिव्य मराठी

Aug 05,2019 08:29:00 AM IST

बर्मिंगहॅम - सलामीवीर राेहित शर्माच्या (६७) झंझावाती अर्धशतकापाठाेपाठ कृणाल पांड्याच्या (२/२३) धारदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने रविवारी फ्लाेरिडा येथील मैदानावर मालिका विजय संपादन केला. भारताने मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीजचा पराभव केला. भारतीय संघाने २२ धावांनी सामना जिंकला. पावसाच्या व्यत्ययाने विंडीजच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. डकवर्थ लुईसच्या बळावर भारताने हा सामना जिंकला. यासह भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या मंगळवारी गयाना येथील मैदानावर हाेणार आहे.

सलामीच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या भारताने आता मालिकेत सलग दुसरा सामना जिंकला. यासह भारताला मालिका विजयाची आपली माेहीम फत्ते करता आली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात विंडीज संघाने १५.३ षटकांत ४ बाद ९८ धावा काढल्या. दरम्यान पावसाचा व्यत्यय आला. अखेर पंचांनी डीएलनुसार निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला. धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीज संघाकडून राेमवान पाॅवेलने एकाकी झंुज देताना अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर सुनील नरेन (४) आणि लेव्हिस (०) हे दाेघेही स्वस्तात बाद झाले. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट काेहलीचा हा निर्णय सलामीवीर राेहित आणि धवनने सार्थकी लावला. त्यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. यादरम्यान त्यांनी ६७ धावांची भागीदारी रचली. विराट काेहलीने २८ धावांचे याेगदान दिले. या सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (४) अपयशी ठरला.


राेहितचे शानदार अर्धशतक : टीम इंडियाच्या सलामीवीर राेहित शर्माने झंझावाती अर्धशतक ठाेकले. त्याने ५१ चेंडूंचा सामना करताना ६ चाैकार आणि तीन षटकारांच्या आधारे ६७ धावांची खेळी केली. यासह त्याने संघाला दमदार सुरुवात करून दिली. या दरम्यान त्याला सलामीवीर शिखर धवनची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली.

पाॅवेलचे नाबाद अर्धशतक : सलामीच्या पराभवातून सावरलेल्या विंडीजला विजयी ट्रॅकवर आणण्यााठी राेवमान पाॅवेलने कंबर कसली. त्याने भारतीय गाेलंदाजीचा धाडसाने सामना करताना अर्धशतक साजरे केले. मात्र, त्याला साथ देणाऱ्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. पाेलार्डने ३४ चेंडूंत ५४ धावा काढल्या. यात सहा चाैकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. मात्र, इतर फलंदाजांना फार काळ आव्हान कायम ठेवता आले नाही.

X