आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचे यंदाच्या सत्रात सर्वाधिक 35 विजय; सलग चाैथ्या वर्षी नाेंदवला पराक्रम

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • भारतीय संघाने सात कसाेटी, 19 वनडे, 9 टी-20 सामने जिंकले; ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी
  • सर्वाधिक धावांमध्ये काेहली अव्वल, दुसऱ्या स्थानावर राेहित शर्मा
  • 7 कसाेटी भारताने 2019 सत्रात जिंकल्या आहे.
  • 19 वनडे व 9 टी-20 जिंकून भारत मर्यादित षटकांत सर्वात यशस्वी संघ.

​​​​​​नवी दिल्ली : जबरदस्त फाॅर्मात असलेल्या टीम इंडियाने यंदाच्या २०१९ च्या सत्राचा शेवट विजयाने गाेड केला. भारताने आपल्या घरच्या मैदानावर आयाेजित मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत विंडीजचा पराभव केला. यासह भारताने विंडीजवर मालिका विजयाची नाेंद केली. यातूनच भारतीय संघाच्या नावे आता २०१९ च्या कॅलेंडर वर्षात तिन्ही फाॅरमॅटमध्ये (कसाेटी, वनडे, टी-२०) सर्वाधिक ३५ विजयांची नाेंद झाली. अशा प्रकारचे सर्वाधिक विजय संपादन करणारा भारत हा अव्वल संघ ठरला. भारताने सलग चाैथ्या वर्षी सत्रात सर्वाधिक विजयांची नाेंद करण्याचा पराक्रम गाजवला. भारताने यापूर्वी २०१८, २०१७ आणि २०१६ मध्येही अशीच सर्वाधिक विजयांची कामगिरी केली हाेती. भारताने यंदाच्या सत्रात ७ कसाेटी, १९ वनडे आणि ९ टी-२० सामने जिंकले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ३० विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

कसाेटीत सर्वच विजय

भारतीय संघाने सत्रात एकूण आठ कसाेटी सामने खेळले. यात सर्वाधिक सात विजयांसह भारतीय संघ अव्वल ठरला. यातील एक कसाेटी सामना अनिर्णीत राहिला.

विदेशात भारतीय संघाची सरस खेळी


टीम : सामने : विजय : परा
भारत : 19 : 12 : 5
इंग्लंड : 19 : 9 : 7
ऑस्ट्रेलिया : 14 : 8 : 5
श्रीलंका : 28 : 7 : 19
अफगाणिस्तान : 7 : 4 : 3

२००० पासून विजयात ऑस्ट्रेलिया आघाडीवर

१ जानेवारी २००० पासून आजतागायत ओव्हरऑल रेकाॅर्डवर नजर टाकल्यास भारतीय संघ विजयात दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ तिन्ही फाॅरमॅटच्या ८४७ सामन्यांत सर्वाधिक ५२७ विजयांसह अव्वल स्थानावर आहे

तिन्ही फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक विजय संपादन करणारे संघ


टीम : धावा : सरासरी : 100
भारत : 14492 : 43 : 29
ऑस्ट्रेलिया : 13625 : 41 : 27
इंग्लंड : 12696 : 33 : 21
पाकिस्तान : 11084 : 32 : 20
न्यूझीलंड : 10640 : 36 : 19

तिन्ही फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे संघ
टीम : विकेट : सरासरी : 5
भारत : 433 : 28 : 11
ऑस्ट्रेलिया : 417 : 29 : 13
इंग्लंड : 393 : 31 : 8
न्यूझीलंड : 363 : 29 : 10
वेस्ट इंडीज : 331 : 34 : 6

३० विजयांसह ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या स्थानावर

काेहली २४५५ धावांवर टाॅपवर

फलंदाजीच्या कामगिरीमध्ये भारताचा विराट काेहली हा सर्वात वरचढ ठरला. त्याने २०१९ मध्ये आतापर्यंत २४५५ धावांची कमाई केली. यामध्ये सात शतकांसह १४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने २५४ धावांची सर्वाेत्तम अशी नाबाद खेळी केली आहे. राेहित हा २४४२ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यात त्याच्या नावे प्रत्येकी १० शतके आणि अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यादरम्यान २१२ धावांची माेठी खेळी केली. तसेच २४४ चाैकार व ७८ षटकार ठाेकले. तिन्ही फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा पराक्रम टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीने गाजवला. ताे या सत्रामध्ये सर्वात सरस फलंदाज ठरला.


फलंदाज : सामने : धावा : सरासरी : शतक
विराट कोहली : 44 : 2455 : 65 : 7
राेहित शर्मा : 47 : 2442 : 53 : 10
बाबर आझम : 36 : 2082 : 58 : 6
रॉस टेलर : 39 : 1820 : 51 : 3
ज्याे रुट : 37 : 1790 : 43 : 5

पॅट कमिन्सचे सर्वाधिक ९४ बळी

गाेलंदाजीच्या क्षेत्रात ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स हा सर्वात सरस ठरला. त्याने यंदाच्या सत्रात ३४ सामन्यांत प्रतिनिधित्व करताना ९४ विकेटची कमाई केली. त्याच्या नावे दाेन वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम नाेंद आहे. २३ धावा देत सहा बळी घेत त्याने सर्वाेत्तम कामगिरी नाेंद आपल्या नावे केली. तसेच भारताचा शमी ३० सामन्यांच्या ३८ डावांत ७७ बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावे ३५ धावा देत पाच विकेटची सर्वाेत्तम कामगिरी नाेंद आहे.