आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-20 च्या फाॅरमॅटमध्ये अाॅस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे सर्वाधिक विजयाचे रेकाॅर्ड!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट टीम अाता अागामी दाेन महिन्यांच्या अाॅस्ट्रेलियन दाैऱ्यावर रवाना हाेणार अाहे. याच दाैऱ्यात टीम इंडिया तीन टी-२०, चार कसाेटी अाणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार अाहे.येत्या २१ नाेव्हेंबरला या दाैऱ्यातील सामन्यांना सुरुवात हाेईल. क्रिकेटच्या झटपट फाॅरमॅट टी-२० मधील सलामीला भारत अाणि यजमान अाॅस्ट्रेलियन संघ समाेरासमाेर असतील. यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका रंगणार अाहे. ब्रिस्बेनच्या मैदानावर हा सलामी सामना हाेईल.  

 

 पाहुण्या विंडीजविरुद्धच्या टी-२० मालिका विजयाने  अाता भारतीय संघ जबरदस्त फाॅर्मात अाहे. भारताने ही मालिका ३-० ने अापल्या खिशात घातली.  अाता हीच मालिका विजयाची लय या दाैऱ्यातही कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. 


अाॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे वर्चस्व :   अांतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टी-२० या एकमेव फाॅरमॅटमध्ये भारताच्या संघाला अातापर्यंत बलाढ्य मानल्या जाणाऱ्या अाॅॅस्ट्रेलियाविरुद्धचे अापले वर्चस्व अबाधित ठेवता अाले अाहे.  या फाॅरमॅटमध्येच भारताने या संघाविरुद्ध सर्वाधिक विजय संपादन केले अाहेत.   या दाेन्ही संघांमध्ये अातापर्यंत ११ वर्षांत टी-२०चे १५ सामने ‌झाले अाहेत. यातील १० सामन्यांत भारताने विजयी पताका फडकवली, तर  ५ सामन्यात अाॅस्ट्रेलियाला विजयाची नाेेंद करता अाली अाहे. अाता भारत या टीमविरुद्ध मालिकेत तीन सामने खेळणार अाहे.

 

भारतासमाेर अाता दुसरे स्थान कायम ठेवण्याचे अाव्हान 
भारतीय संघासमाेर अाता अायसीसी टी-२०च्या क्रमवारीतील अापले दुसरे स्थान कायम ठेवण्याचे माेठे अाव्हान असेल. भारताच्या नावे अाता १२७ गुण अाहेत. पाकचा संघ १३८ गुणांसह अव्वल स्थानावर कायम अाहे. तसेच अाॅस्ट्रेलियाच्या संघाने ११८ गुणांसह अापले तिसरे स्थान कायम ठेवले अाहे. त्यामुळे या संघाची नजर अाता दुसऱ्या स्थानावर लागली अाहे. मालिका विजयाने टीमला हे स्थान गाठण्याची माेठी संधी अाहे. यातून भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण हाेईल. 

 

यंदा सत्रात टी-२० मध्ये भारताचे सर्वाधिक विजय   
टीम इंडियाने यंदाच्या सत्रात सर्वाधिक विजयाच्या बाबतीमध्ये दुसरे स्थान गाठले अाहे. त्यामुळे भारताची या सत्रात टी-२० मधील कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. भारताने या वर्षात १६ टी-२० सामने खेळले अाहेत. यातील १३ सामन्यांत भारताला विजयाची नाेंद करता अाली,  त्यामुळे भारताला दुसऱ्या स्थानावर धडक मारता अाली. या फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक विजयांत पाकचा संघ अव्वल स्थानावर अाहे. या संघाने १९ पैकी १७ सामने जिंकले अाहेत. त्यापाठाेपाठ अाॅस्ट्रेलिया टीम तिसऱ्या स्थानावर अाहे. 

बातम्या आणखी आहेत...