Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | Off The Field | Team India's prepare strategy for World Cup preparations

वर्ल्डकप पूर्वतयारीसाठी टीम इंडियाचे डावपेच; न्यूझीलंडविरुद्ध 'हुकमी एक्के' बाहेर काढणार नाहीत 

विनायक दळवी | Update - Jan 20, 2019, 09:27 AM IST

ऑस्ट्रेलियापेक्षा न्यूझीलंड दौरा खडतर असल्याची जाणीव टीमला आहे.

 • Team India's prepare strategy for World Cup preparations

  मुंबई- टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील अभूतपूर्व यशाचा उदोउदो होत असला तरीही प्रत्यक्षातील वास्तव वेगळे आहे. संघ व्यवस्थापनाला हा संघ परिपूर्ण नसल्याची जाणीव आहे. नवख्या ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करताना त्या चुका महागात पडल्या नाहीत. त्यामुळेच सोमवारपासून सुरू होणारा न्यूझीलंड दौरा ऑस्ट्रेलियापेक्षा खडतर आणि वेगळाच असेल याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे.

  स्पष्टच सांगायचे झाले तर एकदिवसीय मालिकेतील यशावर संघ व्यवस्थापन खुश नाही. तिसरा, मेलबोर्न येथील निर्णायक सामना आपण अखेरच्या षटकांपर्यंत न्यायला नको होता. भारताच्या डावात तब्बल दीडशे चेंडू एकही धाव न घेता टोलवले गेले. म्हणजे निम्मी षटके आपण निर्धाव घालवली, असा याचा अर्थ होतो. हीच गोष्ट व्यवस्थापनाला खटकली आहे. ऑस्ट्रेलियन संघ धावांचा पाठलाग करायला या वेळी घाबरत होता. हे सत्य भारतीयांना पहिल्याच सामन्यात उमगलं होतं. त्यामुळे खेळपट्टी कितीही ओलसर असली तरीही हा संघ प्रथम फलंदाजीचा करण्यास उत्सुक होता. मेलबोर्नला खेळपट्टीतील ओलसरपणा ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण डावात होता.

  भारताच्या डावाची निम्मी षटके होईपर्यंत हा ओलसरपणा टिकला. त्यानंतर मात्र खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली झाली होती. तरीही भारतीयांनी १५० चेंडूंवर एकही धाव घेतला नाही, हे कटू सत्य आहे.

  दुसरे कटू सत्य म्हणजे, धोनीने मालिकावीर हा किताब पटकावला असला तरीही तो तरुण खेळाडूंसमवेत फार काळ खेळू शकणार नाही. चाैथ्या स्थानासाठी धोनीचा व्यवस्थापन विचारही करत नाही. कारण धोनी खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी बरेच चेंडू घेतो. एवढेच नव्हे, तर 'स्ट्राइक रोटेट' करत नाही. त्यामुळे समोरचा फलंदाजदेखील थंडावतो. मेलबोर्नच्या सामन्यात केदार जाधवची बॅट तळपली नसती तर कदाचित धोनीची संथ फलंदाजी भारताला महागात पडली असती. म्हणूनच व्यवस्थापनाला वाटते, धोनी अखेरच्या निर्णायक षटकांमध्येच अनुभवाच्या जोरावर फलंदाजीसाठी उपयुक्त ठरू शकतो. फिनिशर म्हणूनच त्याची भूमिका योग्य असल्याचे त्यांचे मत आहे. मात्र, वरच्या क्रमांकाला तो आता न्याय देऊ शकत नाही.

  न्यूझीलंडचा दाैरा अधिक खडतर
  ऑस्ट्रेलियापेक्षा न्यूझीलंड दौरा खडतर असल्याची जाणीव टीमला आहे. उष्ण वातावरणातून तात्काळ थंड वातावरणात खेळण्याचा फटका बसेल. परंतु न्यूझीलंड संघ विद्यमान ऑस्ट्रेलियन संघापेक्षा किती तरी पटींनी वरचढ आहे याचीही त्यांना जाणीव आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे केवळ २०१९च्या विश्वचषकाच्या पूर्वतयारी एवढ्याच दृष्टिकोनातून टीम इंडिया पाहत आहे. न्यूझीलंड दौऱ्यात कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल या दोन मनगटी फिरकी गोलंदाजांना 'उघडे' पाडायचे नाही, असे डावपेचआहेत.

Trending