आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजविरुद्ध विक्रमी विजय, काेहलीची नाबाद 94 धावांची खेळी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हैदराबाद : विराट काेहली (नाबाद ९४) अाणि लाेकेश राहुल (६२) यांच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर यजमान भारतीय संघाने अापल्या घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध धडाकेबाज विजयाची नाेंद केली. भारताने शुक्रवारी सलामीच्या टी-२० सामन्यात ६ गड्यांनी विजय संपादन केला. भारताचा हा विंडीजवरचा विक्रमी विजय ठरला. भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना उद्या रविवारी तिरुवनंतपुरम येथे हाेणार अाहे.

शिमराेन हेटमेयरच्या (५६) अर्धशतकी खेळीच्या बळावर विंडीज संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद २०७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने चार गड्यांच्या माेबदल्यात िवजयाचे लक्ष्य सहज गाठले. भारताने २००+चा स्काेअर असताना विंडीजविरुद्ध पाचव्यांदा विजयाची नाेंेद केली अाहे. विंडीज संघाला तीन वर्षे अाणि ३७ सामन्यांनंतर प्रथमच टी-२० च्या फाॅरमॅटमध्ये २०० पेक्षा अधिक धावांचा स्काेअर उभा करता अाला. या संघाने २०१६ मध्ये भारताविरुद्ध ६ बाद २४५ धावांचा शेवटचा माेठा स्काेअर नाेंदवला हाेता. अाता हेटमेयरच्या अर्धशतकाच्या बळावर विंडीजला हा पल्ला गाठता अाला. सलामीवीर लुईसने ४० धावांचे महत्त्वाचे याेगदान दिले. भारतीय संघाकडून फिरकीपटू यजुवेंद्र चहलने दाेन विकेट घेतल्या.

यजुवेंद्र चहलच्या दाेन विकेट

भारतीय संघाचा अापल्या घरच्या मैदानावरील दबदबा कायम ठेवण्यासाठी युवा गाेलंदाज यजुवेंद्र चहलची कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्याने संघाकडून सर्वाधिक दाेन विकेट घेतल्या. त्याने चार षटकांत ३६ धावा देताना दाेन बळी घेतले. त्याने यादरम्यान अर्धशतकवीर हेटमेयर अाणि कर्णधार पाेलार्डला बाद केले. तसेच दीपक चाहर, वाॅशिंग्टन सुंदर अाणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला. यादरम्यान भुवनेश्वर हा अपयशी ठरला. त्याने चार षटकांत ३६ धावा दिल्या.

विराट काेहली, लाेकेशच्या खेळीने साकारला विजय

यजमान भारतीय संघानेे कर्णधार विराट काेहली अाणि सलामीवीर लाेकेश राहुलच्या झंझावाती खेळीच्या बळावर शानदार विजय साकारला. लाेकेश राहुलने ४० चेंडूंत पाच चाैकार व ४ षटकारांसह ६२ धावांची खेळी केली. त्यापाठाेपाठ विराट काेहलीने ५० चेंडूंत प्रत्येकी ६ चाैकार व षटकारांसह नाबाद नाबाद ९४ धावांची खेळी केली.

हेटमेयरचे पहिले अर्धशतक; १६ डावांनंतर केली खेळी

विंडीज संघाच्या हेटमेयरने करिअरमध्ये या फाॅरमॅटचे पहिले अर्धशतक ठाेकले. त्याने ४१ चेंडूंत ५६ धावा काढल्या. त्याने १६ डावांनंतर हे यश संपादन केले.

धावफलक नाणेफेक भारत (गाेलंदाजी)

वेस्ट इंडीज : धावा - चेंडू - ४ - ६
सिमन्स झे. शर्मा गाे. चाहर - ०२ - ०४ - ०० - ०
लेव्हिस पायचीत गाे. सुंदर - ४० - १७ - ०३ - ४
किंग यष्टी.ऋषभ गाे. जडेजा - ३१ - २३ - ०३ - १
हेटमेयर झे. शर्मा गाे. चहल - ५६ - ४१ - ०२ - ४
पाेलार्ड त्रि.गाे. चहल - ३७ - १९ - ०१ - ४
जेसन हाेल्डर नाबाद - २४ - ०९ - ०१ - २
दिनेश रामदीन नाबाद - ११ - ०७ - ०१ - ०

अवांतर : ०६. एकूण : २० षटकांत ५ बाद २०७ धावा. 

गडी बाद हाेण्याचा क्रम : १-१३, २-६४, ३-१०१, ४-१७२, ५-१७३. 

गाेलंदाजी : वाॅशिंग्टन सुंदर ३-०-३४-१, दीपक चाहर ४-०-५५-१, भुवनेश्वर कुमार ४-०-३६-०, रवींद्र जडेजा ४-०-३०-१,
यजुवेंद्र चहल ४-०-३६-२, शिवम दुबे १-०-१३-०.

भारत : धावा - चेंडू - ४ - ६
राेहित झे.हेटमेयर गाे. पियरे - ०८ - १० - ०१ - ०
लाेकेश झे. पाेलार्ड गाे. पियरे - ६२ - ४० - ०५ - ४
विराट काेहली नाबाद - ९४ - ५० - ०६ - ६
ऋषभ झे. हाेल्डर गाे. काॅट्रेल - १८ - ०९ - ०० - २
श्रेयस अय्यर झे. गाे. पाेलार्ड - ०४ - ०६ - ०० - ०
शिवम दुबे नाबाद - ०० - ०० - ०० - ०

अवांतर : २३. एकूण : १८.४ षटकांत ४ बाद २०९ धावा. 

गडी बाद क्रम : १-३०, २-१३०, ३-१९३, ४-१९३. 

गाेलंदाजी : शेल्डन काॅट्रेल ४-०-२४-१, जेसन हाेल्डर ४-०-४६-०, खाॅरी पियरे ४-०-४४-२, वाल्श २-०-१९-०, विल्यम्स ३.४-०-६०-०, पाेलार्ड १-०-१०-१.

सामनावीर : विराट काेहली, भारत

भारतीय संघाची १-० ने मालिकेत अाघाडी; दुसरा सामना उद्या

बातम्या आणखी आहेत...