आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Team's Reels And Real Players Are Came Together, The Story Of World Champions Will Appear On The Big Screen After 36 Years

एकत्र आले टीमचे रील आणि रियल खेळाडू, 36 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर दिसेल विश्व विजेत्यांची कहाणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : '83' चित्रपटाच्या मेकर्सने टीमच्या सर्व खेळाडूंचा लूक रिव्हील केला आहे. अशातच चित्रपटातील हिरो आणि '83' वर्ल्ड कप मॅचचे खरे हीरो एकत्र एका मंचावर आले होते. चेन्नई येथील चेपक स्टेडियममध्ये हा नजारा पाहायला मिळाला. लेटेस्ट लूक रिव्हीलमध्ये टीम इंडियाचे मॅनेजर असलेले पीआर मान सिंहचा लूक शेअर केला गेला होता. ही भूमिका पंकज त्रिपाठी साकारणार आहे. 

आतापर्यंत चित्रपटातील अभिनेते जीवा, चिराग पाटील, साकिब सलीम, जतिन सरना, ताहिर राज भसीन, दिनकर शर्मा, निशांत दाहिया, हार्डी संधू, साहिल खट्‌टर, एमी विर्क, धैर्य करवा, आदिनाथ कोठारे, आर बद्री आणि रणवीर सिंह यांचा लूक रिलीज केला गेला आहे.

साऊथमध्ये प्रमोट करणार कमल आणि नागार्जुन

'83' चित्रपटाचे तमिळ आणि तेलगु व्हर्जनचे प्रमोशन साऊथचे सुपरस्टार कमल हासन आणि नागार्जुन अक्किनेनी करणार आहेत. डायरेक्टर कबीर खान यांनी दोन्ही स्टार्ससोबत फोटो शेअर करून याची माहिती दिली.

चित्रपटात दीपिकादेखील असणार आहे...

रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेमध्ये आहे. सुनील गावस्कर यांच्या भूमिकेत ताहिर राज भसीन, मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकिब सलीम, संदीप पाटिल यांच्या भूमिकेत चिराग पाटिल, तर दीपिका पदुकोण चित्रपटात रोमी म्हणजेच कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये एक कॅमियो करणार आहे.

देशातील सर्वात मोठा स्पोर्ट्स चित्रपट म्हणून साकारणारा चित्रपट '83' 10 एप्रिल 2020 ला हिंदी, तमिळ आणि तेलगुमध्ये रिलीज होणार आहे.