आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Teaspoons, 2 Screw Drivers, 2 Toothbrushes And A Knife Removed From The Stomach Of A Youth

युवकाच्या पोटातून काढले 9 चमचे, 2 टूथ ब्रश आणि एक चाकू, दीड तासाच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांना यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंडी (हिमाचल प्रदेश) :  येथील डॉक्टरांनी ऑपरेशन करून 35 वर्षीय युवकाच्या पोटातून 2 चमचे, 2 टूथ ब्रश आणि 2 स्क्रू ड्रायव्हर आणि एक चाकू बाहेर काढले. एसएलबीएस मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या एका चमूने हे ऑपरेशन केले. जवळपास दीड तास हे ऑपरेशन चालले. आता रूग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.   

 

डॉ.रणेश चौहान यांनी सांगितले की, 'रूग्णाला येथे आणले होते तेव्हा त्याच्या पोटातून अर्धा चाकू बाहेर आलेला होता. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. यामुळे आम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. तो एक मानसिक रोगी आहे.'

 

मेडिकल भाषेत या रोगाला बेजोआर म्हणतात
डॉ. चौहान यांनी सांगितले की, 'मानसिकदृष्ट्या रोगी असलेला व्यक्ती अशाप्रकारच्या गोष्टी सहजरित्या खातो. तो काय खात आहे याबाबत त्याला समजत नसते. साधारण मनुष्य अशाप्रकारच्या गोष्टी आपल्या गळ्याच्या खाली देखील उतरवू शकत नाही.' रुग्णाची आतील सिस्टम चोक झाल्यानंतर जेव्हा या गोष्टींमुळे त्रास होतो तेव्हा याबद्दल माहीत होते. अशाप्रकारच्या रूग्णांनी मेडिकल भाषेत बेजोआर आजार नावाने ओळखले जाते.