आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Tech Alert: Free Wi Fi Is Not Completely Secure, Remember These Five Things As A Precaution

टेक अलर्ट : फ्री वाय-फाय पूर्णपणे सुरक्षित नसतो, सावधगिरी म्हणून या पाच गोष्टी लक्षात ठेवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क - तुमचे वाय-फाय राउटर योग्यरित्या कॉन्फिगर नसेल तर हॅकर्स सहजरित्या तुमचे राउटर हॅक करू शकतात आणि तुम्ही डेटाचा उपयोग कोणत्या कामासाठी केला याबाबत जाणून घेऊ शकतात. फ्री वाय-फायच्या शोधात असणाऱ्यांना कशाप्रकारे जाळ्यात ओढायचे हे हॅकर्सला माहीत असते. अशातच तुम्ही फ्री वाय-फायच्या शोधात असता तेव्हा एखाद्या हॅकरच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता असते. कारण हे हॅकर्स नेहमी मिळत्या-जुळत्या नावाने आपले कनेक्शन बनवत असतात. जसे की, CAFE_WIFI किंवा WIFICAFE, आता यातील एक योग्य आणि दुसरे चुकीचे. यांना तेव्हाच ओळखणे कठीण असते जेव्हा तुम्ही पूर्ण माहिती घेत नाहीत. ही माहिती पोस्टर्स किंवा मालकाकडून घेतली जाते. 


फ्री वाय-फायचा उपयोग करताना या पाच गोष्टी लक्षात ठेवा 

फ्री वाय-फायचा उपयोग करायचा असेल तर व्यक्तिगत माहिती देण्याची आवश्यकता भासणाऱ्या वेबसाइटवर जाऊ नका. बँक अकाउंट, आधार नंबर, घराचा पत्ता अशाप्रकारची व्यक्तिगत माहिती फ्री वाय-फाय वरून कोणत्याही वेबसाइटला देऊ नका. 

नेटवर्क व्हेरिफाय करूनच वाय-फायला कनेक्ट व्हा. एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन यांसारख्या ठिकाणी फ्री वाय-फायचे अधिकृत लॉगइन असते. ते जर दिसत नसेल तर तुम्ही शोधत असलेला फ्री वाय-फाय दुसरा आहे. 

HTTPS वेबसाइट्सवरच सर्फ करा. फक्त HTTP असेल तर सर्फिंग करणे धोकादायक ठरू शकते. 


अँटीव्हायरस सिस्टमला क्रॅक करणाऱ्या सॉफ्टवेअरपासून संरक्षित करते. फायरवॉल सक्षम ठेवा. अवघड पासवर्डचा अवलंब करा.  

व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN)चा उपयोग करा. सार्वजनिक वाय-फायमध्ये हे तुम्हाला सुरक्षित ठेवेल. VPN सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरक्षित ठेवते. 

बातम्या आणखी आहेत...