नागपूर / केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठ्या विमान अपघातातून बचावले; वैमानिकाच्या प्रसंगावधानाने विमानाचे उड्डाण रद्द

विमानातील बिघाड लक्षात येताच उड्डाण रद्द करण्याचा घेतला निर्णय

प्रतिनिधी

Aug 13,2019 12:31:24 PM IST

नागपूर - नागपुरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात तांत्रिक बिघाड आल्यामुळे मंगळवारी सकाळी विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. या विमानातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्लीला जात होते. गडकरींसह सर्व प्रवाशांना विमानातून सुखरुप उतरवण्यात आले आहे. प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार इंडिगोच्या 6 ई 636 विमानात गंभीर बिघाड असल्याचे निदर्शनास आल्यावर वैमानिकाने ते रनवेवरून पुन्हा टॉक्सिवे वर आणले. या विमानात 100 पेक्षा अधिक प्रवासी होते.

X
COMMENT