Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Technically, Bharadara Dam is full of capacity

तांत्रिकदृष्ट्या भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले

प्रतिनिधी | Update - Aug 13, 2018, 11:34 AM IST

भंडारदरा धरणाचा पाणीसाठा रविवारी सकाळी सहा वाजता १०४४१ दलघफू झाला. धरणाची साठवण क्षमता ११०३९ दलघफू असून १५ ऑगस्टपूर्वीच

  • Technically, Bharadara Dam is full of capacity

    अकोले- भंडारदरा धरणाचा पाणीसाठा रविवारी सकाळी सहा वाजता १०४४१ दलघफू झाला. धरणाची साठवण क्षमता ११०३९ दलघफू असून १५ ऑगस्टपूर्वीच धरण तांत्रिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने भरल्याचे अहमदनगर जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी जाहीर केले.


    रविवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या २४ तासांत धरणात ३४८ व निळवंडे धरणात १६७ असे मिळून ५१५ दलघफू म्हणजे अर्धा टीएमसी नवीन पाणी आले. १ जूनपासून भंडारदरा धरणात १३६९१ व निळवंडे धरणात ७००७ दलघफू नव्याने पाणी आले. दोन्ही धरणे मिळून २०६९७ दलघफू नवीन पाणी आले. याच कालावधीत ४ हजार दलघफू पाणी शेतीसाठी देण्यात आले. यापुढे धरणाची पाणीपातळी १०५०० दलघफूवर नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. भंडारदऱ्यातील साठा १०४४१ दलघफू म्हणजे ९४.५८ टक्के आहे. अंब्रेला फाॅलमधून १८० व वीज निर्मिती प्रकल्पासाठी ८१९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. अद्यापही पाण्याची गुळणी सांडव्याबाहेर पडलेली नाही. लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी निळवंडे धरणातून १५०० क्युसेक प्रवरापात्रात विसर्ग सुरू असून कालवे १९५२ क्युसेकने सुरू आहेत. या आठवड्यात पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू असल्याने ८२०० दलघफू क्षमतेच्या निळवंडे धरणाचा साठा ६५०९ दलघफूवर (७८.२३ टक्के) पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रातील घाटघर, पांजरे, रतनवाडी, भंडारदरा परिसरात तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Trending