• Home
  • Business
  • Technology : How Smartphone Cameras will Improve in Photos and Videos at 2020

टेक / 2020 मध्ये स्मार्टफोनच्या कॅमेरात होणार बरेच बदल, प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी उपयोगी पडेल

  • सर्व मोबाइल कंपन्या फोन कॅमेऱ्याच्या लेंसना अद्यावत बनवत आहे
  • यामुळे 2020ला 108 मेगा पिक्सलचा युग म्हणता येईल 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 15,2020 12:47:00 PM IST

रवि शर्मा

पुणे - स्मार्टफोनची परिभाषा सतत बदलत आहे. सुरुवातीच्या काळात मोबाइलचा उपयोग कॉलिंग, मेसेजिंग, चॅटिंगसोबत काही युटिलिटी अॅप्स म्हणून वापर केला जात होता. परंतु आता प्रोफेशनल फोटोग्राफी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मोबाइलचा वापर केला जातो. सर्व मोबाइल कंपन्या फोन कॅमेऱ्याच्या लेंसना अद्यावत बनवत आहे. यामुळे या वर्षी अर्थात 2020 मध्ये फोन कॅमेरा पूर्वीपेक्षा अधिक अद्यावत होणार आहे.

रिझॉल्युशन वाढणार

2019 मध्ये 48एमपी आणि 64एमपी सेंसर्स अगदी सामान्य झाले आहेत. शाओमी एमआय नोट 10 ने 108 एमपीला परवडणारे बनवले आहे. आता 2020 ला 108एमपी चा काळ म्हणू शकतो. सॅमसंग गॅलक्सी एस11 मध्ये 9टू1 पिक्सल बायटिंग टेक्नॉलॉजीसोबत 108एमपीचे स्वतःचे सेंसर मिळू शकते. सॅमसंग 144 एमपी कॅमेरा सेंसरवर काम करत आहे. याचा पिक्सल साइज 0.720यूएम असेल. सेंसर हार्डवेअर सुद्धा 200 एमपी सेंसर्सला सपोर्ट करणारे असतील.


व्हिडिओची रेंज वाढेल

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 चीप बहुधा फ्लॅगशिप फोन्सला ताकद देते. यामुळे 120 फ्रेम प्रति सेकंदावर 4X स्लो-मोशन व्हिडिओ करणे सोपे होते. तसेच 865 ची क्षमता 720पी 960 फ्रेम पर सेकंदावर सुपर स्लो-मोशन व्हिडिओची शुटिंग करण्यासाठी सपोर्ट करू शकते. या तंत्रज्ञानाने हाय-रिझॉल्युशन व्हिडिओ किंवा स्लो-मोशन व्हिडिओ टाइम लिमिट शिवाय शूट करू शकतो.

योग्य फोकस

हायएंड 2020 स्मार्टफोन्समध्ये सोनीच्या 2X2 ऑन चिप लेन्स सेंसर तंत्रज्ञानाचा उपयोग सुरु झाला आहे. याला ऑल पिक्सल ऑटोफोकस देखील म्हटले जाते. यामध्ये सेंसरच्या सर्व पिक्सलचा उपयोग फोकस करण्यासाठी केला जातो. यामुळे हॉरीजॉन्टल ऑटोफोकस चांगला होतो.

एआय फोटोग्राफी होईल स्मार्ट


जवळपास प्रत्येक स्मार्टफोन ब्रँड आपल्या फोनमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. फोटो एडिट करण्यासाठी यावर्षी उत्तम एआय फीचर्स मिळतील. या फीचर्ससाठी गूगल पिक्सल 4 सारखे स्मार्टफोन खरेदी करण्याची आवश्यकता नाही. हे तंत्रज्ञान आता मध्यम दरातील फोनमध्ये पाहायला मिळेल.

अधिक झूम

2019 मध्ये काही फोन्समध्ये टू ऑप्टिकल झूम कॅमेरे मिळाले होते. उत्तम क्वालिटीच्या फोटोसाठी हा महागडा उपाय नाही. यामुळे मध्यम दरात झूम क्षमता वाढणे निश्चित आहे.

X