आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानामुळे बेअर ग्रिल्सशी हिंदीत संवाद साधणे सोपे झाले - पंतप्रधान मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. १२ आॅगस्टला डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ कार्यक्रमाला उल्लेख करत मोदी म्हणाले की, काही लोक मला संकोचाने एक गोष्ट विचारतात की, तुम्ही हिंदी बोलत होते आणि बेअर ग्रिल्स यांना तर हिंदी येत नाही. मग तुमच्या दोघांत एवढ्या वेगाने चर्चा कशी काय होत होती? ती नंतर संपादित करण्यात आली होती का? मोदी म्हणाले की, यात काहीही रहस्य नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, बेअर ग्रिल्सशी संवाद साधताना तंत्रज्ञानाचा खूप वापर करण्यात आला. जेव्हा मी काही बोलत असे तेव्हा त्याचा त्वरित इंग्रजीत अनुवाद होत होता. ग्रिल्सच्या कानात खूप लहान रिमोट ट्रान्सलेटर लावलेला होता, तो माझ्या बोलण्याचा  लगेच इंग्रजीत अनुवाद करत होता. त्यामुळे ग्रिल्स यांना माझे म्हणणे समजत होते. तंत्रज्ञानामुळे आमचा संवाद खूप सोपा झाला. ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ कार्यक्रमामुळे भारताचा संदेश, भारताची परंपरा, दौऱ्यात निसर्गाप्रति संवेदनशीलता या सर्व गोष्टींमुळे जगाला भारताचा परिचय होण्यात मदत झाली असावी अशी माझी अपेक्षा आहे. 

मोदींनी कृष्णजन्माष्टमीचा तसेच मुरलीधारी मोहन आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मशताब्दीचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, माझे लक्ष दोन मोहनकडे जाते-एक सुदर्शन चक्रधारी मोहन आणि दुसरे चरखाधारी मोहन. सुदर्शन चक्रधारी मोहन यमुना किनारा सोडून गुजरातमध्ये समुद्र किनाऱ्यावर द्वारकापुरी येथे राहिले, तर समुद्रकिनाऱ्यावर जन्मलेले चरखाधारी मोहन यांनी यमुना किनाऱ्यावर येऊन दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. एकाने युद्ध टाळण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली, तर दुसऱ्याने शांततेचा संदेश देत योग्य मार्गावर चालण्याचा रस्ता दाखवला. 
 

प्लास्टिकचा वापर टाळण्याचे केले नागरिकांना आवाहन
पंतप्रधानांनी लोकांना ११ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरपर्यंत ‘स्वच्छताच सेवा’ ही मोहीम विशेष बनवण्याचे आणि प्लास्टिकचा उपयोग न करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. देशाच्या वेगवेगळ्या भागांत कुटुंबासह फिरा आणि देश समजून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
 

बातम्या आणखी आहेत...