आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Technology: The Rich Are Getting Hurt, The Poor Are Embracing Themselves

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेक्नाॅलॉजी : श्रीमंतांना चटक लागत आहे, गरीब आत्मसात करत आहेत

एका वर्षापूर्वीलेखक: एन. रघुरामन
  • कॉपी लिंक

श्रीमंतांची कहाणी : 


या कुटुंबांनी समस्या ओळखल्या आहेत आणि त्यावर उपाय करत आहेत. पण आपणापैकी बहुतेक लोक याकडे लक्ष देत नाहीत. जे कोणत्या ना कोणत्या स्क्रीनवर तासन॰तास खर्च करत आहेत. मी कमीत कमी अशा चार लोकांना जाणतो, ज्यांच्यावर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस सेंटर फॉर वेलबिइंग (निम्हान्स), बंगळुरूच्या शट (सर्व्हिस फॉर हेल्दी युज ऑफ टेक्नॉलॉजी) क्लिनिकमध्ये उपचार झालेले आहेत. टेक्नॉलॉजीची चटक लागलेल्या लोकांवर उपचार करणारे शट क्लिनिक हे भारतातील पहिले सेंटर आहे.

या रुग्णांनी फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारण्याची धमकी दिली होती, जेव्हा त्यांच्या आई वडिलांनी डोटा-२ आणि पबजीसारख्या मल्टिप्लेअर ऑनलाइन व्हिडिओ गेम्स खेळण्यापासून रोखण्यासाठी त्याच्याकडून लॅपटॉप काढून घेतला होता. मुलांनी ३५-३५ तास हे गेम्स खेळण्यासाठी जेवण आणि झोपही सोडून दिली, तेव्हा पालकांना याचे गांभीर्य लक्षात आले. जून २०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या ‘गेमिंग डिस्ऑर्डर’ला इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजच्या अकराव्या आवृत्तीत सामील केले. गेल्या वर्षी अमेरिकेच्या लाइमलाइट नेटवर्क्सने एक अहवाल जारी केला, ज्यानुसार २४.२ टक्के भारतीयांनी गेम्स खेळण्यासाठी नोकऱ्या सोडून दिल्या. ५२ टक्के भारतीय कामाच्या ठिकाणीही गेम खेळतात. हे प्रमाण जगात मोठे आहे. ४५ टक्के भारतीय गेमर्सनी गेम्स खेळण्यासाठी झोप घेणे सोडले, ३७ टक्के लोकांनी जेवण सोडले तर ३५ टक्के लोकांनी मित्रांना भेटणेही सोडले. या गोष्टी चिंताजनक आहेत. गेल्या वर्षी ‘द असोसिएशन बिटवीन मोबाइल गेम अॅडिक्शन अँड डिप्रेशन, सोशल अँक्झाइटी अँड लोन्लीनेस’ या नावाने एका संशोधन अहवालानुसार व्हिडिओ गेम्सची चटक लागलेल्या नवयुवकांमध्ये सर्वात जास्त नैराश्य, सामाजिक चिंता आणि एकटेपणाची समस्या दिसून आली शट क्लिनिकमध्येही उपचार घेणाऱ्यांमध्ये २०० पुरुषांच्या तुलनेत एक महिला असे प्रमाण आहे.

गरिबांची कहाणी : 


जेव्हा तुम्ही बंगळुरूला याल आणि कोणत्याही रोडवरून गाडीने प्रवास कराल, तेव्हा अशी गोष्ट पाहाल की, जी बाकीच्या शहरांपेक्षा वेगळी आहे. येथे भाज्या, फळे, प्लास्टिक भांडी, झाड़ू आणि रोजच्या गरजेच्या वस्तू विकायला घेऊन जाणारे फेरीवाले आपल्या आवाजाने तसेच अनोख्या अंदाजाने ग्राहकांना आकर्षून घेतात. ते केवळ या भाज्यांची नावेच घेत नाहीत तर यापासून तुम्ही काय बनवू शकता, हेही सांगतात. या फेरीवाल्यांनी अॅम्प्लिफाइड स्टिरिओ सिस्टिम बसवली असून माल विक्रीसाठी घोषणा अगोदरच रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत. मंडईत कोणत्या भाज्या मिळतील या हिशेबाने या अनाउन्समेंट तयार करून ठेवलेल्या आहेत. हे विक्रेते एक असा माइक खरेदी करतात, ज्यात रेकॉर्ड, प्ले, पॉज आणि रिसेट या पर्यायांसोबतच साउंड बॉक्सही असतो. अंदाजे दोन हजारांच्या या सिस्टिममध्ये रोज मेसेज रेकॉर्ड केले जातात. यातील इनबिल्ट मेमरी चिपमधून एकदा रेकॉर्ड करून ते अनेकदा प्ले करतात. रिचार्जेबल बॅटरी तीन तास रिचार्ज केल्यानंतर ६ ते ८ तास चालते. अनेक आऊटसोर्सिंग युनिट्सही आहेत, ज्यातून ते आकर्षक आवाजातून आपल्या पसंतीच्या भाषेतून मेसेज मिळवू शकतात.

फंडा असा : टेक्नाॅलॉजीने तुम्हाला नियंत्रित करण्याऐवजी, टेक्नाॅलॉजीवर तुमचे नियंत्रण हवे आहे.