आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोला बेडरुममध्ये एकटी सोडुन नवरा दाराजवळ बसला, त्यांच्या 18 वर्षाच्या मुलीने शेअर केला फोटो, फोटो मागच सत्या जाणल्यावर नवऱ्याला सॅलूट करु लागले लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - अमेरीकेतील एका मुलीने तिच्या वडीलांचा एक फोटो शेअर केला त्यात ते एका रुमच्या बाहेर खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. हा फोटो पाहून सुरुवातीला लोकांना काही कळाले नाही  पण जेव्हा या फोटो मागची सत्यता लोकांना कळाली तेव्हा त्या वडीलांना सगळे सॅल्यूट करू लागले. या फोटोच्या माध्यमातुन आई वडीलांमधील प्रेम दाखवण्याचा प्रयत्न त्या मुलीने केला आहे. 

 

फोटो मध्ये दाखवली आई वडीलांची बॉडिंग

- ही गोष्ट अमेरीकेतील फ्लेगस्टाफ शहरातल्या मॅकेना न्यूमेन ची आहे. 18 वर्षाच्या मॅकेना मागच्या वर्षी एप्रिलमध्ये वडील जॅानचा एक फोटो शेअर केला होता. त्यात ते एका रुमच्या बाहेर बसलेले दिसत आहेत.

-हा फोटो शेअर करताना त्यासोबत तिने असे लिहले की, कँसर रेडीएशनमुळे माझ्या आईला तिच्या खोलीच्या बाहेर जाता येत नाही, ती कोणाला भेटुही शकत नाही. त्यामुळे माझे वडील रुमच्या दाराजवळ बसून तिला कंपनी देतात.

-हा फोटो शेअर करुन ती हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की,  ह्या अश्या कठीण प्रसंगी सुध्दा तिचे वडील तिच्या आईची कीती काळजी घेत आहेत.

 

थायरॉइड कँसरने ग्रस्त होती तिची आई.

- मैकेना ची आई मर्सी ला आक्टोबर 2016 मध्ये थायरॉइड कँसर असल्याचे निदान झाले. पण डॉक्टरांनी हेही सांगितले की सध्या आजार प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे उशीर न करता रेडिएशन ट्रीटमेंटचे उपचार सुरु करावे लागेल.

-रेडिएशन ट्रीटमेंटच्या दरम्यान रुग्णाला सगळ्यांपासून वेगळे एका रुममध्ये ठेवले जाते. त्जेया रेडिएशनचा त्रास इतरांना होऊ नये यासाठी असे केले जाते. पण मॅकेनाच्या वडिलांना वेगळे राहावत नव्हते, त्यामुळे ते दिवसभर रुमच्या बाहेर बसून बायकोला कंपनी द्यायचे.

- मॅकेनाने सांगितले की, ते आईसोबत सगळीकडे जायचे, प्रत्येक डॉक्टरला भेटत होते, प्रत्येक ब्लड टेस्ट, प्रत्येक सर्जरी, प्रत्येक रेडिएशनच्या वेळेस तिच्या सोबत असायचे. 

-आपल्या आई वडिलांच्या या बाँडिंगला सगळ्या जगाला दाखवण्यासाठी मॅकेनाने फोटोला शेअर केला. त्या फोटोला 1.5 लाख पेक्षा जास्त नी लाइक केले तर 70 हजार लोकांनी रिट्वीट केल आहे.  

-फोटो शेअर केल्यानंतर साधारण एका वर्षानंतर अप्रिल 2018 ला सोशल मेडियावरुन सांगितले की, तिची आई आता पुर्णपणे बरी आहे.

 

बातम्या आणखी आहेत...