आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक दिवसांपासून तरुणीचा पाठलाग करत होता टॅक्सी ड्रायव्हर, अनेकदा दिला प्रेमाचा प्रस्ताव, पण तरुणीने दिला नकार, चिडलेल्या ड्रायव्हरने उचलले हे भयंकर पाऊल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषिकेश - उत्तराखंडमध्ये एक भयचकित करणारी घटना समोर आली आहे. येथे एका टॅक्सी ड्रायव्हरने एकतर्फी प्रेमात कॉलेजच्या एका तरुणीला पेट्रोल ओतून आग लावली. या घटनेत पीडित विद्यार्थिनीचे शरीर 77 टक्के भाजले. तिला गंभीर अवस्थेत ऋषिकेशहून दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले. तेथे सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरला घटनेच्या दिवशीच अटक केली होती. सूत्रांनुसार, या घटनेचा तरुणीच्या आईला एवढा धक्का बसला की, त्यांना हार्ट अटॅक आला आहे.

 

तरुणीने ठोकरला प्रस्ताव
- ऋषिकेश पोलिसांना चौकशीत आढळले की, आरोपी टॅक्सी ड्रायव्हर तरुणीचा पाठलाग करत होता. यादरम्यान त्याने तरुणीसमोर अनेकदा प्रेमाचा प्रस्ताव ठेवला, परंतु प्रत्येक वेळी तरुणीने नकार दिला.
- शेवटी 16 डिसेंबर रोजी आरोपी ड्रायव्हर पुन्हा एकदा तरुणीजवळ गेला, परंतु या वेळीही तरुणीने त्याचे म्हणणे ऐकले नाही, यामुळे ड्रायव्हर चिडला. 
- रागाच्या भरात आरोपी ड्रायव्हरने तरुणीवर पेट्रोल ओतून तिला आग लावली. तरुणी ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेऊन आग विझविली. विद्यार्थिनीला गंभीर भाजलेल्या अवस्थेत एम्समध्ये दाखल करण्यात आले.

 

भाजले होते फुप्फुस
- येथे तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही म्हणून तिला दिल्लीला रेफर करण्यात आले. यानंतर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले, येथे सोमवारी उपचारादरम्यान तरुणीची प्राणज्योत मालवली.
- डॉक्टरांनी सांगितले होते की, तरुणीला सर्वात जास्त जखमा चेहरा आणि फुप्फुसात झाल्या होत्या. मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच तिचा आईलाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...