18 वर्षीच्या विद्यार्थ्याने अॅपल कंपनीवर ठोकला 7000 कोटींचा दावा, कंपनीच्या चुकीमुळे विद्यार्थ्याला झाली होती अटक


बोस्टनमध्ये चोरीच्या घटने दिवशी मॅनहट्टनमध्ये होता पीडित विद्यार्थी 

दिव्य मराठी

Apr 25,2019 06:03:00 PM IST

न्यूयॉर्क- येथील एका विद्यार्थ्याने अॅपल कंपनीविरूद्ध 1 अब्ज डॉलर (7000कोटी रूपये) चा दावा ठोकला आहे. 18 वर्षीय ओस्मान बाह याने सोमवारी कोर्टात याचिका दाखल केली. ओस्मानचे म्हणने आहे की, अॅपलच्या फेशिअल-रिकग्निशन सॉफ्टवेअरने त्याचे नाव अॅपल स्टोरमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेशी लिंक केले. यामुळे नोव्हेंबर 2018 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती.


बोस्टनमध्ये चोरीच्या घटने दिवशी मॅनहट्टनमध्ये होता पीडित विद्यार्थी
बाहने सांगितल्यानुसार पोलिसांच्या वॉरंटमध्ये ज्या व्यक्तीचा फोटो होता, तो अजिबात माझ्याशी मिळता-जुळता नव्हता. अॅपल स्टोअरमधील चोरीच्या ज्या घटनेत मला आरोपी बनवले गेले, त्यातील एक प्रकरण बोस्टनचे आहे. पण ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी मी मॅनहट्टनमध्ये होतो.


ओस्मानचे म्हणाला, त्याचे फोटो नसलेले लर्नर परमिट हरवले होते. बहुदा, ते परमिट चोराला सापडले असावे आणि त्याने माझ्या आयडीचा अॅपल स्टोरमध्ये वापर केला असावा. यामुळे अॅपलच्या सॉफ्टवेअरने त्याचे नाव चोरांच्या चेहऱ्यासोबत जोडले असेल. चोरीच्या घटनेत संशयित लोकांना ट्रॅक करण्यासाठी अॅपल आपल्या स्टोर्समध्ये फेशिअल-रिकग्निशन सिस्टीमचा उपयोग करते. पीडित विद्यार्थ्याचे म्हणने आहे की, खोट्या आरोपांमुळे त्याला मानसिक तणाव आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागला. न्यूजर्सीत अॅपल स्टोरमध्ये चोरीच्या घटनेच्या प्रकरणात बाहविरूद्ध आतापर्यंत केस चालू आहे, पण इतर प्रकणातून त्याची निर्दोष सुटका झाली आहे.

X