आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपल फोडायची सवय असेल तर या मुलाची स्टोरी वाचायलाच हवी, छोटीशी चूक जीवावर बेतली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूपोर्ट - तरुण वयामध्ये चेहऱ्यावर पिंपल्स होणे हे अगदी नॉर्मल आहे. अनेकदा मुले मुली हे पिंपल स्वतःच दाबून फोडट असतात. पण इंग्लंडमधील एता तरुणाला असे करणे एवढे महागात पडले की, त्याचा जीवावर हे संपूर्ण प्रकरण बेतले होते. या तरुणाला मानेवर पिंपल झाला होता. त्याने हाताने डाबून हा पिंपल फोडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मानेवर खूपच सूज आली. काही दिवसांची त्याची अवस्था एवढी खराब झाली की, त्याला हॉस्पिटलला तर जावे लागलेच पण त्याचबरोबर तीन ऑपरेशनही करावे लागले. 


झाला होता जीवघेणा सेप्सिस
- इंग्लंडच्या न्यूपोर्टमधील 17 वर्षाच्या गेरेंट मुलिनच्या मानेवर झालेल्या एका छोट्याशा पिंपले रुपांतर एका फोडात झाले. एक दिवस घरी बसून टीव्ही पाहताना त्याने तो फोडला. आधीही अनेकदा त्याने असे केले होते. 
- त्यानंतर त्याला वाटले की ते दुसऱ्या दिवशी बरे होईल. पण तो झोपेतून उठला तर मान पाहून त्याला धक्काच बसला. कारण ती प्रचंड सुजली होती आणि घावही मोठा झाला होता. 
- चार दिवसांनी त्याची अवस्था एवढी बिघडली की डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला लगेच अॅडमिट करून घेतले. पिंपल फोडल्याने त्याला 'सेप्सिस' झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे घाव सडू लागत असतो. 
- डॉक्टरांनी सांगितले की, जीव वाचवण्यासाठी ऑपरेशन करावे लागतील. त्यानंतर तीन आठवडे गेरेंट हॉस्पिटलमध्येच होता. तीन ऑपरेशन करून त्याचा जीव वाचवण्यात आला. 


दरवर्षी 4 लाख लोक गमावतात जीव 
गेरेंटने यापूर्वी सेप्सिस हे नावही ऐकले नव्हते. एक पिंपल फोडल्याने असे काही होईल असे त्याला कधीही वाटले नव्हते. गेरेंट आता इतरांमध्ये जनजागृती पसरवतो. पिंपल फोडण्याचे साइड इफेक्ट सांगतो. वेळीच ट्रीटमेंटमुळे जीव वाचला असे त्याचे मत आहे. 'सेप्सिस' मुळे इंग्लंडमध्ये गरवर्षी जवळपास 4 लाख लोकांचा जीव जातो. ही संख्या त्याठिकाणी कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा जास्त आहे. 'सेप्सिस' इन्फेक्शनमुळे पसरतो. 


(ही स्टोरी 'मेडिकल सायन्स सिरीज' अंतर्गत देत आहोत. जगभरातील मेडिकल सायन्सशी संबंधित अशा अनेक घटना आपल्यासाठीही ज्ञानवर्धक आणि माहिती देणाऱ्या ठरू शकतात.)

 

बातम्या आणखी आहेत...