आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Horror: 14 वर्षांची असताना झाले अपहरण, गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून कंटेनरमध्ये डांबले; रोज व्हायचा अमानवीय लैंगिक अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडच्या न्यू हॅम्पशायर येथे राहणाऱ्या तरुणीने गेल्या कित्येक महिन्यांपासून आपल्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराची आपबिती मांडली आहे. ही घटना 5 वर्षांपूर्वी घडली होती. त्यावेळी या तरुणीचे वय फक्त 14 वर्षे होते. ती घराकडे येत असताना वाटेत तिचे अपहरण करण्यात आले. तिला अपहरणकर्त्यांनी एका कंटेनरमध्ये कैद केले होते. याच ठिकाणी तिच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून 9 महिने लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. तरुणीने पहिल्यांदाच आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची हकीगत मांडली आहे. 


नियंत्रणात ठेवण्यासाठी गळ्यात बांधळा बेल्ट
एबिगेल हरनँडेझ असे या तरुणीचे नाव असून तिने 2013 मध्ये नरकयातना भोगल्या होत्या. शाळा सुटल्यानंतर ती घराकडे निघाली होती. त्याचवेळी अचानक एक किबी नावाच्या आरोपीने तिला अडवून अपहरण केले. यानंतर तो तिला आपल्या मोकळ्या प्लॉटवर घेऊन गेला. तेथून 30 मैल दूर त्याचे एक मोठे ट्रेलर थांबले होते. त्या ट्रेलरच्या कंटेनरमध्ये त्याने एबिगेलला कैद केले. एबिगेल सांगते, "तेव्हापासूनच त्याने अमानवीय यातना देण्यास सुरुवात केली. नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याने माझ्या गळ्यात डॉग बेल्ट बांधला होता. लैंगिक अत्याचार करत असतानाच तो मला अमानवीय शारीरिक आणि मानसिक यातना देत होता."

 

निर्जण स्थळी सोडून गेला
कैदेत असताना त्याने पीडितेला कधीच आपले नाव कळू दिले नाही. तो स्वतःला मास्टर असे म्हणवत होता. त्याने पीडित एबिगेलला आपण कुठे आहोत याची कधी जाणीव देखील होऊ दिली नाही. 9 महिने त्याच्या कैदेत राहिल्यानंतर जुलै 2014 मध्ये त्याने एबिगेलला आपल्या कारमध्ये बसवले आणि दूरस्थ ग्रामीण भागात घेऊन गेला. ते ठिकाण अगदी निर्जण स्थळ होते. याच ठिकाणी आरोपीने एबिगेलला कारच्या बाहेर फेकले आणि कार वळवून निघून गेला. कित्येक किमी पायी चालल्यानंतर अखेर एबिगेलला मदत मिळाली आणि तिने आपले घर गाठले.
 

असा अटकेत आला आरोपी
एबिगेलने सांगितल्याप्रमाणे, "मला प्रश्न पडला होता की अखेर 9 महिने अत्याचार केल्यानंतर त्याने माझी सुटका कशी केली. माझ्याकडून काहीच धोका नाही असे त्याला वाटले असावे. परंतु, त्याचे नेमके कारण मला माहिती नव्हते." घरी परतल्याच्या एका आठवड्यानंतर एबिगेलने आपल्या कुटुंबियांसह पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्यावर बेतलेल्या अत्याचाराची तक्रार दाखल केली. आरोपीला त्याच्या घरातूनच अटक करण्यात आली. यानंतर कोर्टात झालेल्या प्रत्येक सुनावणीत एबिगेलने आरोपीचा धाडसी सामना केला आणि त्याला शिक्षा मिळवून दिली. 2016 मध्ये आरोपी किबीला 45 वर्षांची कैद सुनावण्यात आली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...