आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन दीर भावजयीवर करत होता बळजबरी, 4 वर्षांचा चिमुकला पाहताक्षणी ओरडला- मी पप्पांना सगळं सांगेन; आरोपीने दोघांनाही ठार मारले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मध्य दिल्लीतील प्रेम नगर परिसरात डबल मर्डरचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एका घरात 26 वर्षांची विवाहिता आणि तिच्या 4 वर्षांच्या चिमुकल्याचे मृतदेह सापडले. विवाहितेचा गळा चिरला होता. तसेच तिच्या डोक्यावर आणि शरीराच्या विविध भागांवर जखमा होत्या. तर चिमुकल्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. पोलिसांनी महिलेचा स्मार्टफोन चेक केला तेव्हा त्यांना एका किशोरवयीन मुलाचा सेल्फी सापडला. घटनेच्या अवघ्या काही तासांपूर्वी संबंधित अल्पवयीन मुलाने त्या महिलेसोबत सेल्फी घेतला होता. शेजाऱ्यांनी हा मुलगा तिचा दीर असल्याचे सांगितले. पोलिसांनी वेळीच त्या मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

 

20 दिवसांपासून पीडित कुटुंबासोबत राहत होता आरोपी
> आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो मूळचा बिहारच्या मुजफ्फरपूर येथील रहिवासी आहे. 20 दिवसांपूर्वी तो आपल्या दूरच्या भाऊ-भावजयीसोबत राहायला आला होता. याच दरम्यान त्याने आपल्या वहिणींवर वाइट नजर टाकली. घटनेच्या दिवशी त्याने महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांचे काही सेल्फी घेतले. यानंतर तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केला तेव्हा तिला मारहाण सुरू केली. तिच्या डोक्यात दगड घातल्याने ती शुद्धीवर नव्हती. यानंतर तिच्यावर रेप करण्याचा प्रयत्न केला.
> याच दरम्यान महिलेचा 4 वर्षांचा मुलगा आला. अतिशय घाबरलेल्या त्या मुलाने पप्पा आल्यावर त्यांना सगळं सांगेन असे म्हटले. रागाच्या भरात आरोपी त्याला देखील मारण्यासाठी पुढे जात होता. तेवढ्यात महिला शुद्धीवर आली आणि तिने आरोपीच्या पायाचा चावा घेतला. त्यावर पुन्हा चिडलेल्या आरोपीने महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा गळाच चिरला. यानंतर तिच्या मुलाचा गळा आवळून मृतदेह पंख्याला लटकवला.


3 तास घराबाहेरच फिरत होता आरोपी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मर्डर केल्यानंतर आरोपीने साबणाने घरातील रक्ताचे डाग स्वच्छ केले. परंतु, घटनास्थळावरील धारदार चाकू, रक्ताने माखलेला दगड आणि सफाईसाठी वापरलेली साबण तशीच ठेवली. यानंतर घराबाहेरच तीन तास फिरत होता. पोलिसांनी त्याला प्रेम नगर परिसरातूनच अटक केली.

बातम्या आणखी आहेत...