मुलीने मायक्रोवेवमध्ये उकडण्यासाठी ठेवले होते अंडे, पण नंतर जे झाले त्यामुळे तिला मिळाल्या आयुष्यभरासाठीच्या वेदना

दिव्य मराठी

Apr 24,2019 01:37:00 PM IST


न्यूकॅसल - इंग्लंडमध्ये नाश्ता तयार करतेवेळी एक तरूणीसोबत भयंकर घटना घडली. यामध्ये मुलीच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. मिळालेल्या माहितीनुसार मुलीने मायक्रोव्हेवमध्ये अंडे उकडण्यासाठी ठेवले होते. पण ते बाहेर काढताच फुटले. या घटनेनंतर तिला दोन्ही डोळ्यांनी दिसेनासे झाले. असे असले तरी काही दिवसांनी मात्र तिच्या एका डोळ्याची दृष्टी परत आली आहे. पण एका डोळ्याने मात्र तिला अद्यापही दिसत नाही.

अंडे उकडने पडले महागात

> न्यूकॅसल शहरातील रहिवासी कर्टनी वूड (19) या मुलीसोबत ही घटना घडली. मायक्रोवेव्ह अंडे उकडताना ती जखमी झाली.

> मुलीने सकाळच्या नाश्त्यासाठी एका जगात पाणी आणि अंडे टाकून ते उकडण्यासाठी माइक्रोवेवमध्ये ठेवले. तिने यापूर्वीही असे अनेकवेळा केले होते.

> एक मिनिटानंतर मायक्रोवेवमधून अंडे बाहेर काढले. पण अंड्याला हात लावतचा ते फुटले. यादरम्यान तिला स्वतःला सावरता आले नाही. या घटनेत तिच्या चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या.

> झालेल्या जखमांमुळे भयानक पीडा होत होती. पीडेपासून वाचण्यासाठी तिने जखमांना थंड पाण्याने धुतले आणि मित्रांना फोन करून बोलावून घेतले. यानंतर मात्र तिला दिसेनासे झाले होते. अखेर ती डॉक्टरकडे गेली.


दोन दिवसांनंतर आली डोळ्यांची दृष्टी

> कर्टनीची जखम गंभीर नाही पण या अपघातात तिच्या दोन्ही कॉर्नियाला नुकसान झाले आहे. यामुळे तिला दिसत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या डोळ्यांची नजर कधीही परत येऊ शकत असल्याचे ते म्हणाले.

> दोन दिवसांनी कर्टनीला उजव्या डोळ्यांनी दिसू लागले. पण डाव्या डोळ्याची दृष्टी अजूनही आली नव्हती. तिच्या डाव्या डोळ्याची दृष्टी परत येण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

> मायक्रोवेव कंपन्या देखील ग्राहकांना मायक्रोवेवमध्ये अंडे न उकडण्यासाठी सुचित करत असतात. कारण यामुळे अंडे फुटण्याची भीती असते.

X