आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसाठी फ्रीज खरेदी करण्यासाठी 35 किलोची नाणी घेऊन गेला मुलगा; दोन हजार रुपये कमी पडले असता शोरूमने केले असे काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - येथील सहारन नगर येथील 17 वर्षीय रामसिंहने सकाळी वृत्तपत्रात फ्रिजची जाहीरात बघितली असता शोरूममध्ये फोन केला. त्याच्या आईचा वाढदिवस आहे आणि तो आईला फ्रिज भेट म्हणून द्यायचे आहे. पण तो फक्त चिल्लर पैसेचे देऊ शकेल असे त्याने फोनवर सांगितले. यानंतर शोरूम संचालक हरिकिशन खत्री यांनी चिल्लर स्वीकारण्याची हमी दिली. यानंतर रामसिंह तब्बल 35 किलोची चिल्लर घेऊन शोरूममध्ये गेला. या चिल्लरमध्ये एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. 
शोरूम संचालकाने पैसे मोजले असता 2 हजार रुपये कमी पडले. यानंतर रामसिंहच्या भावनांचा विचार हरिकिशन यांनी दोन रुपयांची सूट देत एक भेटवस्तू देखील दिली. 
 

12 वर्षांत जमा केले 13500 रुपयांची चिल्लर
रामसिंहला लहानपणापासूनच गल्ल्यात पैसे जमा करण्याचा छंद होता. गल्ला भरल्यानंतर आई त्या चिल्लरच्या मोबदल्यात नोट देत होता. पण नाणी संभाळून ठेवत होता. गेल्या 12 वर्षांत त्याने 13,500 रुपयांचे नाणे गोळा गेले. हिच नाणी घेऊन तो शिव शक्ती नगर येथील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात फ्रिज घेण्यासाठी गेला होता. 
 

आपल्या पैशांतून फ्रिज घेऊन देण्याचे वचन दिले होते
रामसिंहने स्वतःच्या पैशातून आईला फ्रिज देण्याचे वचन दिले होते. रामसिंह आणलेले गिफ्ट पाहून आई आणि वडिल दोघेही आनंदीत झाले. तर शोरूम तर्फे रामसिंहला एक गिफ्ट देखील दिले. रामसिंह बीएससीचा विद्यार्थी आहे. तर त्याचे वडील प्रॉपर्टी डिलर आहेत.