• Home
  • National
  • teenager commits suicide jumping over running train after fb post

16 वर्षांच्या मुलाने / 16 वर्षांच्या मुलाने फेसबूकवर लिहिले आत्महत्या करतोय! मित्रांनी खूप केला मन वळवण्याचा प्रयत्न, तासाभरानंतर सापडला मृतदेह

Feb 13,2019 05:00:00 PM IST

जयपूर - राजस्थानच्या नागोर जिल्ह्यात एका 16 वर्षांच्या मुलाने केलेल्या फेसबूक पोस्टवरून एकच खळबळ उडाली. सुरेंद्र कुमार नावाच्या या मुलाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आत्महत्या करत असल्याचे लिहिले. त्याने चक्क एक सुसाइड नोट देखील लिहिला. त्याच्या मित्रांना ही पोस्ट दिसताच त्यांनी वारंवार कॉमेंट करून आणि फोन करून त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न केले. परंतु, सुरेंद्रने कुणाचे काहीही ऐकले नाही. या फेसबूक पोस्टच्या एका तासानंतर त्याने धावत्या मालगाडीसमोर उडी घेत आपले आयुष्य संपविले. सुसाइड नोटमध्ये त्याने आपल्या आत्महत्येसाठी 4 जणांना जबाबदार धरले. परंतु, कुटुंबियांनी कुणाच्याही विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली नाही.


पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सुरेंद्र एक दुचाकी घेऊन रेल्वे ट्रॅकवर गेला होता. त्याने त्याच ठिकाणी आपली बाइक लावली. तसेच समोरून येणाऱ्या भरधाव मालगाडीसमोर उडी घेतली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सुरेंद्रने आत्महत्या करत असल्याची माहिती फेसबूकवर पोस्ट केली तेव्हा मित्रांना सुरुवातीला विश्वासच बसला नाही. तो मस्करी करत असावा असेच त्यांना वाटत होते. काही वेळात त्यांनी कॉमेंट करून सुरेंद्रची विचारपूस केली. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी कॉल करण्याचाही प्रयत्न केला. परंतु, सुरेंद्रने काहीच प्रतिसाद दिला नाही. तो नेमका कुठे आहे याची कुणालाही माहिती नव्हती. सुरेंद्रपर्यंत कुणी पोहोचतील यापूर्वीच त्याने रेल्वेसमोर उडी घेतली.


सुसाइट नोटमध्ये नेमके काय?
''मी सुरेंद्र सांगवा, माझे स्वप्न खूप मोठे होते. पण, माझ्या आयुष्यात असे काही मित्र आले, ज्यांनी माझे अख्खे आयुष्यच उद्ध्वस्त केले. माझ्याच मित्रांपैकी काही तर मला ठार मारण्याचा कट रतत होते. परंतु, आता मी स्वतःच जातो. संपूर्ण गोष्ट सांगण्यासाठी माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि माझी लेखणी सुद्धा तेवढी चांगली नाही." युवकाने आपल्या आई-वडिलांची माफी मागतानाच पत्राच्या शेवटी 'हनुमान बेनीवाल झिंदाबाद' असेही लिहिले.


आमदार म्हणाले, चौकशी करा...
आमदार हनुमान बेनीवाल यांना या घटनेची माहिती सोशल मीडियावरून कळाली. सुसाइड नोट सार्वजनिक झाल्यानंतर पोलिस त्या युवकाला थांबवणे तर सोडा त्याची लोकेशन सुद्धा ट्रेस करण्यात अपयशी ठरले. योग्य वेळी त्याचा पत्ता लागला असता तर तो युवक वाचला असता. त्यामुळे, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. सोबतच, युवकासमोर अशा कोणत्या परिस्थिती आल्या होत्या, ज्यांनी त्याला आत्महत्या करण्यासाठी विवश केले याची सुद्धा चौकशी करावी असे आवाहन आमदारांनी केले.

X