आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO जीप घेऊन वाऱ्याच्या वेगाने निघालेला तरुण थेट घुसला ट्रकमध्ये, एका क्षणात जळून खाक झाली गाडी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यू हॅम्पशायर - अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायरमध्ये एका हायवेवर एका जीप आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. मोठ्या आकाराच्या ट्रकला भरधाव वेगाने जाणारी जीप धडकताच स्फोट झाला आणि जीप जळून खाक झाली. मागून येणाऱ्या दुसऱ्या एका कारमध्ये हे सर्व रेकॉर्ड झाले. त्यानंतर जे काही समोर आले त्यावर कोणालाही विश्वासच बसत नव्हता. ही जीप 18 वर्षांचा सॅम लेचांस नावाचा तरुण चालवत होता. व्हिडीओत दिसत आहे की, सॅमची जीप चुकीच्या लेनवर गेल्यानंतर थेट ट्रकला धडकली आणि तिला आग लागली. पण सुदैवाने सॅम त्यात भाजला गेला नाही. 


सॅमच्या जीपमध्ये आग लागताच मागून येणारी आणखी एक कार त्याला धडकली. कारमध्ये जाणाऱ्या व्यक्तीने आणि त्यांच्या मुलाने घाईत बाहेर निघत सॅमला बाहेर काढले आणि इमर्जन्सी सर्व्हीसला लगेचच कॉल केला. जवळपास असलेल्या लोकांना याचे आश्चर्य वाटत होते की स्फोट झाल्याने जळालेल्या जीपमध्ये जळण्यापासून सॅम मात्र बचावला होता. 


पुढे वाचा, दुसऱ्या धडकेने वाचवला जीव.. 

बातम्या आणखी आहेत...