आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Teenager Is Allergic To Her Own TEARS Because Of A Rare Condition That Causes Her To Break Out In Hives If She Touches Water

या तरूणीला आहे विचित्र आजार, पाण्‍याचा स्‍पर्श होताच अंगावर येतात लाल डाग, पाणी पिणे आणि रडणेही झाले अवघड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर्टफोर्डशायर- इंग्‍लंडमध्‍ये राहणारी एक टीनेजर ए‍का विचित्र आजाराचा सामना करत आहे. तिच्‍या शरीराला पाण्‍याचा स्‍पर्श होताच तिच्‍या सर्व अंगावर लाल डाग येतात. या विचित्र आजारामुळे तिला धड रडताही येत नाही आणि शॉवरखालीही जास्‍त वेळ राहता येत नाही. ऐवढेच नाही तर पाणी पिणेही तिला कठीण झाले आहे. कसेबसे दुध पिऊन तीला आपली तहान भागवावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी तिला आपल्‍याला हा आजार असल्‍याचे समजले.

 

जगात फक्‍त 50 लोकांना आहे हा आजार
- हर्टफोर्डशायरमध्‍ये व्‍हीथमस्‍टेड येथे राहणारी 19 वर्षीय लिंडसे काउब्रे ही तरूणी सध्‍या दुर्लभ अशा एक्‍वाजेनिक अर्टिकेरिया या आजाराने ग्रस्‍त आहे. या आजारात पाण्‍याची शरीराला अशी भयानक एलर्जी होते की, केवळ स्‍पर्शाने सर्वांगावर लाल डाग येतात.
- या आजारामुळे लिंडसेला रडताही येत नाहीए. कारण रडल्‍याने गालावर अश्रू ओघळताच तिला याचा त्रास सहन करावा लागतो.
- हा आजार अत्‍यंत दुर्लभ असून जगात केवळ 50 लोकांनाच हा आजार आहे.
- याबद्दल लिंडसेनी सांगितले आहे की, मी शॉवर घेते तेव्‍हा मला जबरदस्‍त शिंका यायला लागतात आणि सर्वांगावर खाज येते.' लिंडसेनी सांगितले आहे की, यादरम्‍यान तिच्‍या नाकातही जळजळ होते. डोळ्यातून रक्‍त येते व ते सूजतात.


पाण्‍याऐवजी प्‍यावे लागते दूध
- लिंडसेने सांगितले आहे की, पाणी पिल्‍याने तिला तोंडात प्रचंड वेदना होऊ लागतात. यामुळे तिला पाण्‍याऐवजी दुध प्‍यावे लागत आहे.
- या दुर्मिळ अशा आजारामुळे लिंडसेला पावसात भिजता येत नाही तसेच स्‍वीमिंगही करता येत नाही.

 

श्‍वास घेण्‍यासही होतो त्रास
- शरीराला पाण्‍याचा स्‍पर्श होताच लिंडसेला श्‍वास घेण्‍यासही त्रास होतो. यामुळे तिला अनेक दैनंदिनी कामे करणेही अवघड होऊन बसले आहे. तिच्‍यासाठी रोजचा दिवस नवनवे आव्‍हान घेऊन येतो.
- लिंडसेचे म्‍हणणे आहे की, 'मी लोकांना जेव्‍हा या आजाराबद्दल सांगते तेव्‍हा त्‍यांना सर्वाधिक आश्‍चर्य याचेच वाटते की, आपले शरीर ज्‍या 70 टक्‍के पाण्‍याने बनले आहे, त्‍याचीच अॅलर्जी कशी काय होऊ शकते.' सर्वाधिक लोक आपल्‍याला आंघोळ आणि पाणी पिणे कसे मॅनेज करते हेच विचारत असल्‍याचे लिंडसेने सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...