Home | International | China | teeth in nose

चीन : सतत वाहत होते रक्त, तपासात कळले की, नाकात उगवला होता दात

वृत्तसंस्था, | Update - Jun 12, 2019, 11:47 AM IST

आधी दुर्लक्ष केले, डॉक्टरांनी एक्स-रे केल्यानंतर समजले खरे कारण

  • teeth in nose

    बीजिंग - चीनमधील ५७ वर्षीय जियाला खूप वर्षापासून नाकातून रक्त वाहत होते. तिने याकडे दुर्लक्ष केले. नंतर मात्र, तिला पश्चाताप करण्याची वेळ आली. तिचा त्रास खूप वाढल्यानंतर डाॅक्टरांना दाखवले. त्यांनी एक्स-रे काढला. तेव्हा खरे कारण समजले. तिच्या नाकात दात उगवला होता. ते एेकताच ती खूप घाबरली. तिला नाकात दात उगवल्याचे कळलेच नाही. नाकातून रक्त येणे साधारण बाब आहे, असे तिला वाटले.

Trending