Home | National | Other State | Tej Pratap Yadav went Varanasi Instead of Patna Rabri-Aishwarya Waiting for him at Home

तीन दिवसांपासून बेपत्ता आहेत लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र, वडिलांना भेटल्यानंतर आलेच नाही घरी; जाणून घ्या तेजप्रताप-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची कारणे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:52 PM IST

गया वरून पटणा जाणार होते तेज प्रताप, पण तिथे न जाता गेले वाराणसीला

 • वाराणसी - लग्नाच्या अवघ्या 5 महिन्यांनंतर पत्नी ऐश्वर्याला घटस्फोट देण्याच्या निर्णयामुळे लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप चर्चेत आहेत. सध्यातरी ते घटस्फोटाबाबत तडजोड करण्यासाठी तयार नसल्याचे दिसत आहे. वडील लालूप्रसाद यांच्याकडून समजुत मिळाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी पटना येथे त्यांच्या घरी जाणार होते. पण बातमी अशी आहे की रांची येथून गया येथे पोहोचल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर चुकवून वाराणसीकडे गेले. तीन दिवसांपासून घरी न परतलेल्या तेज प्रताप यांनी मिडीयाला सांगितले की. ते कुठेही बेपत्ता झाले नसून देवदर्शनासाठी वाराणसी येथे आले आहेत.

  आई आणि पत्नी घरी वाट पाहत आहेत
  >> सोमवारी सायंकाळी पटणा येथे आई राबडी देवी, पत्नी ऐश्वर्या राय आणि भाऊ तेजस्वी यादव त्यांची वाट पाहत होते. घटस्फोटाची याचिका दाखल केल्यापासून लालू कुटुंबीयांत एकच खळबळ उडाली आहे.
  >> तेजप्रताप यांचे कुटुंबीय त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु ते ऐकायला तयार नाहीत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आता काहीही झाले तरी मी माझा निर्णय बदलणार नाही.
  >> रिपोर्टच्या मते पक्षाचे कार्यकर्ते आणि मिडीयाकर्मी त्यांना भेटण्यासाठी गया येथील हॉटेलवर वाट पाहत होते. पण सगळ्यांची नजर चुकवून मागच्या दरवाजातून बाहेर निघून गेले.

  घटस्फोटामागचे खरे कारण काय?
  >> सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या यांना त्यांचे वडील चंद्रिका रॉय यांनी छपरा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी इच्छा होती. यासाठी ऐश्वर्या यांनी तेजप्रताप यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली होती.
  >> एका वर्षाच्या आत घटस्फोट होऊ शकत नाही हे तेज प्रताप यांनी माहित होते. त्यामुळे त्यांनी लग्नाच्या केवळ सहा महिन्यांनंतरच 2 नोव्हेंबर रोजी न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली.
  >> त्यांना माहित आहे की त्यांच्या अर्जावर अद्याप सुनावणी होणार नाही. अशावेळी या प्रकरणात दारोगा राय कुटुंबाचा दबदबा कमी होऊन लालू परिवाराला फायदा होईल.

  1977 पासून छपरा सीटवर आहे लालू परिवाराचे प्रभुत्व
  >> लालूप्रसाद यादव यांच्या अगोदर दारोगा राय यादवांचे मोठे नेते राहिलेले आहेत. 1977 मध्ये पहिल्यांदाच लालूप्रसाद छपरा मतदारसंघातील निवडणूक जिंकले होते. तेव्हापासून, त्यांचे कुटुंब किंवा त्यांचे निकटवर्तीय त्यांच्या संमतीने येथील निवडणूक लढवत आहेत.
  >> लालू कुटुंब स्वत:च्या राजकीय आणि सामाजिक फायद्याचा विचार करून छपरामधुन कोण निवडणूक लढवणार ठरवत असतात. अशातच ऐश्वर्या यांनी त्यांचे वडील चंद्रिका राय यांचे नाव समोर केल्याने छपराच्या राजकारणात दारोगा परिवार पुन्हा वर्चस्व गाजवू पाहत असल्याची चिंता तेजप्रताप यांना लागली आहे.

 • Tej Pratap Yadav went Varanasi Instead of Patna Rabri-Aishwarya Waiting for him at Home
 • Tej Pratap Yadav went Varanasi Instead of Patna Rabri-Aishwarya Waiting for him at Home

Trending