आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची तेजसमधून भरारी, उड्डाणानंतर व्यक्त केला आपला अनुभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु -  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बंगळुरूमध्ये आज स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानातून अर्धातास उड्डाण केले. राजनाथ तेजस विमानात भरारी घेणार पहिले संरक्षण मंत्री बनले आहेत. या उड्डाणाविषयी बोलताना ते म्हणाले की, बंगळुरूच्या एचएएल हवाई तळावरून स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानातून उड्डाण घेण्याचा अद्भुत आणि थरारक अनुभव होता. दक्षिण पूर्व आशियातील देशांनी तेजस विमान खरेदी करण्यात रुची दाखवली आहे. आता आपण जगभरात तेजसची निर्यात करू शकतो अशा स्तरावर पोहोचलो आहोत. हिंदुस्थान अॅरोनॅटिकल लिमिटेड आणि अॅरोनॅटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने तेजसची निर्मिती केली आहे. 

कॅप्टन नर्मदेश्वर तिवारी यांनी सांगितले की, 'राजनाथ उड्डाणाची गुणवत्ता आणि सहजतेने समाधानी आहेत. जेव्हा विमान मॅक -1 (ध्वनीचा वेग प्रति सेकंद 332 मीटर) वर पोहोचले तेव्हा मी त्यांना याबद्दल माहिती दिली.' दरम्यान संरक्षणमंत्र्यांनी काही काळ तेजस सांभाळले असल्याचे डीआरडीओ प्रमुख जी सतीश रेड्डी यांनी सांगितले. तर राजनाथ सिंह म्हणाले की, 'जसे जसे कॅप्टन सांगत गेले तसे तसे मी करत गेलो.'

 

हवाई दलाने एचएएलकडे 83 तेजस जेट तयार करण्याची सोपवली होती जबाबदारी
हवाई दलाने डिसेंबर 2017 मध्ये एचएएलला 83 तेजस जेट तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती. याची अंदाजे किंमत 50 हजार कोटी रुपये होती. डीआरडीओने 21 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये झालेल्या एअरो शोमध्ये याला फायनल ऑपरेशनल क्लीयरेंस जारी केला होता. म्हणजेच हे विमान युद्धासाठी आता पूर्णपणे तयार आहे.
 

 

तेजसने नुकतीच एक मोठी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली
तेजसे गेल्या आठवड्यात नौदलात सहभागी होण्यासाठी एक मोठी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली होती. डीआरडीओ आणि अॅरोनॅटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी गोव्यातील किनारपट्टीवल तेजसी यशस्वीरित्या लँडिंग केली होती. असा टप्पा गाठणारे तेजस देशातील पहिले विमान ठरले आहे. 

बातम्या आणखी आहेत...