आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेचे खासगीकरण! मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार पहिली खासगी रेल्वे, IRCTC ने भाड्यावर घेतली तेजस एक्सप्रेस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत (लवकुश मिश्रा) - भारतीय रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात प्रथमच खासगी रेल्वे धावणार आहे. ही पहिली वहिली खासगी रेल्वे आयआरसीटीसी घेऊन येत आहे. आयआरसीटीसीने भारतीय रेल्वे विभागाकडून तेजस एक्सप्रेस भाड्यावर (लीझवर) घेतली आहे. हीच एक्सप्रेस नोव्हेंबर महिन्यात मुंबई आणि अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या तपासासाठी स्टेशनवर चेकिंग काउंटर देखील उघडले जातील. ट्रेनला एका तासापेक्षा अधिक विलंब लागल्यास प्रवाशांना त्यांच्या तिकीटाची संपूर्ण रक्कम परत दिली जाईल. या ट्रेनचे भाडे किती असणार यावर आयआरसीटीसी काम करत आहे. पुढे जाऊन हीच एक्सप्रेस लखनौ-दिल्ली मार्गावर सुद्धा सुरू करण्याचे नियोजन आहे. रेल्वे विभागाकडून तिकीटांमध्ये दिल्या जाणारे डिस्काउंट सध्या खासगी रेल्वेत देण्याचा विचार करण्यात आलेला नाही.


वेस्टर्न रेल्वेचे सीपीआरओ रवींद्र भाकर यांनी सांगितले, की तेजस ट्रेन चालवण्याची संपूर्ण जबाबदारी आयआरसीटीसीची असणार आहे. त्याचीच ते सध्या तयारी करत आहेत. यासाठी आयआरसीटीसी रेल्वेला भाडे देखील देणार आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. तरीही ट्रेन कोणत्या शेड्युलवर धावणार हे आधीच जाहीर करण्यात आले आहे.

शताब्दी एक्सप्रेसप्रमाणे आकारले जाऊ शकते तिकीट
आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तेजसचे मूळ भाडे याच रूटवर चालणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसप्रमाणे आकारले जाऊ शकतात. या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात केवळ दोन टॉयलेट असतील. इतर ट्रेनमध्ये प्रति डबा चार टॉयलेट असतात. थोडीशी मोकळी जागा आणि फूड सर्व्हिससाठी नवीन पँट्री कारचे नियोजन केले जात आहे. महसूल वाढवण्यासाठी रेल्वेमध्ये आतून जाहिराती सुद्धा लावल्या जाणार आहेत. तेजस ट्रेनमध्ये एसएलआरसाठी जागा राहील. येथून बुक केलेला माल आणि साहित्य घेऊन जाता येईल.

अपघात झाल्यास रेल्वेच्या नियमानुसारच भरपाई, डिस्काउंट नाही
या खासगी रेल्वेत प्रवाशांना विमा देण्याचा विचार केला जात आहे. प्रवासादरम्यान अपघात घडल्यास रेल्वेच्या नियमाच्या आधीन राहून मदत आणि भरपाई दिली जाणार आहे. या नियमांत आयआरसीटीसीने कुठलाही बदल केला नाही. या ट्रेनमध्ये तूर्तास रेल्वेकडून दिल्या जाणारी कुठलीही सूट लागू करण्याचा विचार नाही. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विकलांग आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. सरकारी रेल्वेत मिळणारे हे डिस्काउंट तूर्तास खासगी रेल्वेत मिळणार नाहीत.