Home | Bollywood | Marathi Cinekatta | tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs

कॅलेंडर 'वंदे मातरम् 2019' च्या माध्यमातून छायाचित्रकार तेजस नेरुरकरचा स्वातंत्र्यवीरांना मानाचा सलाम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 25, 2019, 05:13 PM IST

छायाचित्रकार तेजस नेरुरकरचे अनोखे कॅलेंडर 

 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  प्रितीलता वड्डेदार (पूजा सावंत)

  एन्टटेन्मेंट डेस्क. 'कॅलेंडर' च्या माध्यमातून नवनवीन विषय साकारायला मिळतात, वेगळं असा काहीतरी चाचपण्याची संधी मिळते.. म्हणून ह्या वर्षी सुद्धा एका "कॅलेंडर"च्या रूपात छायाचित्रांचा एक छोटा संच आणला आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांच्या हस्ते या छायाचित्रकार तेजस नेरुरकरच्या "वंदे मातरम् 2019" कॅलेंडरचे लाँच करण्यात आले. याप्रसंगी अविनाश गोवारीकर ह्यांनी तेजसच्या या संकल्पनेचे भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या."वंदे मातरम्" या गीताने गायिका सायली पंकजने या कार्यक्रमाची सुरुवात केली .

  ह्या देशात आपण मुक्तपणे श्वास घेऊ शकतो ,स्वतंत्र राहू शकतो ,, त्या देशाचा प्रत्येक कोपरानकोपरा हा स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून आपल्याला परत मिळाला आहे.. त्यांच्या त्या त्यागाची परतफेड आपल्याकडून होणं केवळ अशक्यच. पण त्यांची आठवण मनाच्याही अंतर्मनात कुठल्याना कुठल्याही रूपात पक्की असावी ह्या धारणेतून कॅलेंडरची संकल्पना प्रत्यक्षात आली. केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी असे दिवस सोडल्यास त्या हुतात्म्यांची आठवण क्वचितच होते, अथवा होते का ? हा मी मलाच विचारलेला प्रश्न! ह्याच प्रश्नाला उत्तर म्हणून , त्या स्वातंत्र्यवीरांना मानवंदना आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी म्हणून ह्या वर्षीच म्हणजेच 2019 चे कॅलेंडर "वंदे मातरम् 2019".

  मराठी सिनेसृष्टीतील जवळपास 26 कलाकारांचा सहभाग यंदाच्या या कॅलेंडरमध्ये करण्यात आला आहे. शरद केळकर, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, प्रवीण तरडे, सुनिल बर्वे, सागर देशमुख, डॉ अमोल कोल्हे, आदिनाथ कोठारे , प्रियदर्शन जाधव , अमेय वाघ , ललित प्रभाकर, अक्षय टांकसाळे, सोनाली कुलकर्णी (jr ) , प्रिया बापट , श्रिया पिळगावकर , प्राजक्ता माळी , सई ताम्हणकर , नेहा महाजन , प्रियांका बर्वे , पूजा सावंत, उर्मिला कानिटकर, श्रेया बुगडे , ऋता दुर्गुळे , तेजश्री प्रधान , स्पृहा जोशी या सर्व कलाकारांचं स्वातंत्र्यवीरांच्या भूमिकेत फोटोशूट केलं. माझ्या छोट्याश्या विनंतीला मान देऊन सर्व जण वेळात वेळ काढून माझ्यासाठी आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  दामोदर हरी चाफेकर (आदीनाथ कोठारे)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  सुब्रमन्यम भारती (अमेय वाघ)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  लक्ष्मी सेहगल (श्रेया बुगडे)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  मंगल पांडे (शरद केळकर)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  कट्टीमल्लू अम्मा (प्रिया बापट)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  सावित्रीबाई फूले (सई ताम्हणकर)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  बिस्रा मुंडा
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  बेगम हजरत महेल
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  सरदार उध्दम सिंह (अमोल कोल्हे)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  शिवराम हरी राजगुरु (सिध्दार्थ जाधव)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  राजकुमारी गुप्ता (प्राजक्ता माळी)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  मनीबेन पटेल (स्पृहा जोशी)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  लोकमान्य टिळक
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  अशफ़ाक़ुल्लाह ख़ाँ
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (सौरभ गोखले)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  कनकलता बरुआ (सोनाली कुलकर्णी)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  दुर्गा भाभी (उर्मिला कोठारे)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  कल्पना दत्त (श्रिया पिळगावकर)
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  नेताजी सुभाषचंद्र बोस
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  कित्तूर राणी चेनम्मा
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  चंद्रशेखर आझाद
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  उमाबाई कुंदापुर
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  वासुदेव बळवंत फडके
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  अजीजन बाई
 • tejas nerurkar new calendar vande mataram, marathi celebs
  स्वामी विवेकानंद (उमेश कामत)

Trending