आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Tejas Thackeray Discusses Political Flock Everywhere After His Presence On Political Platform

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय कळपात प्राणिमित्र तेजस ठाकरे यांचीच सर्वत्र चर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे बुधवारी संगमनेरमध्ये झालेल्या सभेत व्यासपीठावर दिसले. आदित्यपाठोपाठ त्यांनीदेखील राजकारणात पाऊल टाकल्याची चर्चा सभास्थानी रंगली. मात्र, ठाकरे यांनी आपल्या भाषणात ‘तेजसदेखील येथे आला, मात्र तो सभा बघायला आला,’ असे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला. 

खरे तर सभा सुरू होण्यापूर्वी तेजस खाली बसले होते. मात्र, संयोजकांनी त्यांना व्यासपीठावर नेत पहिल्या रांगेत बसवले. त्यांना पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. सभास्थानीदेखील तेजसच्या स्वागताचा मोठा फ्लेक्स लागला होता. युवा सेनेच्या वतीने व्यासपीठावर तेजसचा सत्कारही करण्यात आला. या वेळी तेजसनेही संगमनेरकरांना हात जोडत अभिवादन केले आणि टाळ्या मिळवल्या.

सभेत राधाकृष्ण विखेंचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘बऱ्याच वर्षांनंतर आपण जनतेच्या साक्षीने सर्वांसमोर भेटलो आहोत. दोन पिढ्या या काही वेळ सोबत होत्या, आजही त्या माझ्यासोबत आहेत. साहजिकच याप्रसंगी मला दोन्ही बाळासाहेबांची आठवण आली. त्या वेळी दोन बाळासाहेबांच्या ज्या भेटी होत. पद्मश्रींबद्दलचा आदर. असा पिढ्यांचा आपला ऋणानुबंध आहे. राधाकृष्ण विखेंंचे भाषण मी आधी एेकलेले आहेच, आता सुजय कसा बोलतो याची चुणूक मला बघायला मिळाली. म्हणा पाहिजे तर ही घराणेशाही, आता घराणेशाही म्हटले तर तेजससुद्धा आलेला आहे. मात्र, तेजस नुसता सभा बघायला आला आहे. कारण तो जंगलामध्ये रमणारा आहे, त्याला माहिती आहे की आपल्याकडे वन्यप्राणी नाहीत, ते पलीकडे आहेत,’ असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
 

तेजस जंगलात रमणारा...
तेजस यांच्या सभेतील उपस्थितीवरून चर्चा सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘येथे तेजससुद्धा आलेला आहे. मात्र, तेजस नुसता सभा बघायला आला आहे. कारण तो जंगलामध्ये रमणारा आहे, त्याला माहिती आहे की आपल्याकडे वन्यप्राणी नाहीत, ते पलीकडे आहेत,’ असे सांगताच हशा पिकला.
 

बातम्या आणखी आहेत...