आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोणाच्या शोधात आहे तेजश्री? 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तेजश्रीचा चित्रपट 'हाजरी'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : तेजश्री प्रधान म्हणजे टेलिव्हिजन क्षेत्रातील गाजलेला चेहरा. ही लोकप्रिय अभिनेत्री चित्रपट आणि नाटक या माध्यमातूनसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. तेजश्रीच्या अभिनयाचे आणि तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.

तेजश्रीचा आगामी चित्रपट 'हाजरी' ९ फेब्रुवारीला झी टॉकीज वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतेच या चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला. या प्रोमोला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून तेजश्रीच्या या नव्या चित्रपटाबद्दल सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात तेजश्री स्वप्नालीची व्यक्तिरेखा साकारतेय जी स्पष्टवक्ती आणि सडेतोड आहे. तिची ही भूमिका तिने आधी साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. स्वप्नालीसाठी तेजश्रीचा आवाज देखील वरच्या पट्टीत असणार आहे त्यामुळे तेजश्रीचा या भूमिकेसाठी एक वेगळाच सूर लागलेला प्रेक्षकांना पहायला मिळेल. या चित्रपटात स्वप्नाली ही एक सेल्सगर्ल आहे. ती एका अनुरूप जोडीदाराच्या शोधात आहे. स्वप्नालीच्या नशिबात देखील एखादा चांगला मुलगा असेल जो कदाचित तिचीच वाट बघत असेल अशा भावना ती या प्रोमोमध्ये व्यक्त करते. आता स्वप्नालीच्या नशिबात कोण आहे? तिला अनुरूप जोडीदार मिळेल का? आणि तिच्या लग्नाची गाठ कुठल्या मुलाशी बांधली जाणार? हे पाहण्यासाठी बघा चित्रपट 'हाजरी' 

बातम्या आणखी आहेत...