आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय खाता आणि कसं खाता...?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण जे खातो त्याच परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. काही वेळेस लगेच दिसतो. काही वेळा कालांतराने दिसतो. आपल्या शरीरातील अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी पौष्टीक घटकांची आवश्यकता असते. आपल्या शरीराला दररोजअन्नाच्या स्वरूपात इंधनाची घरात असते. आजची ही बदलती जीवनशैली ,बदलत्या खान्यापिण्याच्या  पद्धती त्यांचा शरीरावर खूपच परिणाम होताना दिसतोय. आपण जे  अन्न खातो त्याचे मानसिक व शारीरिक परिणाम होतात.  आजकाल लोकांनां अन्न हे पोष्टीकतेनुसार आवडत नसून ते चवीनुसार आवडते. कोणताही पदार्थ त्याची चव कशी आहे हे ठरवूनच खाल्ला जातो. पण त्याची चव वाढवण्यासाठी जे अयोग्य घटक त्यात घातले जातात. त्याचा जराही विचार केला जात नाही.  या सर्व गोष्टींमुळे शरीराचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे.  आणि हे खूप उशिराने लक्षात येत मग जेव्हा ते कळत त्यावेळेस पथ्य पाळा, हे खा, ते खा, हे नको ते चांगलं नसत मग त्याला चव नसली तरी ते खाणे बंधनकारक ठरत. अश्या गोष्टीना प्रतिबद्ध करण्यासाठी सुरवातीपासून संतुलित आहार घेण्यास सुरूवात केली तर आपले शरीर उत्तम निरोगी राहू शकते. संतुलित आहार म्हणजे ज्यामध्ये पुरेश्या प्रमाणात कर्बोदके, प्रथिने ,व्हिटॅमिन, मिनरल असतात असा आहार शरीराला लागणाऱ्या उष्णकाचे गणित असते यामध्ये आपल्या शरीराचे वजन किती यावर किती प्रमाणात खायचे हे ठरलेले असते पण आजच्या जीवनशैलीमध्ये किती प्रमाणात खायचे यापेक्षा आपल्याला किती आवडत तेवढं खाल्लं जात. साहजिकच शरीराला न झेपणारा उष्मांक मेद च्या स्वरूपात शरीरात साठवलं जंत व आपल्या शरीरात अनावश्यक चरबी साठून अनेक आजार उद्भवतात त्यासाठी आपण स्वतःच जबाबदार असतो.  प्रत्येकाचे वय, उंची, वजन यानुसार आपण किती प्रमाणात खावे हे ठरलेले असत. जर आपण हे आहार तज्ज्ञाकडून माहिती करून घेतली तर शरीरात योग्य प्रमाणत पौष्टीक घटक जातील यामुळे शरीर निरोगी होण्यास मदत होईल.  खूप जणांना असं वाटून जात कि डायट म्हणजे नुसतं आवडणार खाणे त्याला काही चव नसते पण तास नसता आपण आपल्याला शरीराला योग्य असे पदार्थ पौष्टीक रित्या बनवून आपल्या आवडीनुसार करायच्या पद्धती बदलून समावेश करू शकतो. आपल्या उद्याच्या दिवस आपण आज काय खातो यावर अवलंबून असतो त्यामुळे काहीहि खाताना योग्य कि अयोग्य हा विचार करणे महत्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...