आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Telanga Doctor Rape Case : Hyderabad Police Encounter Of Accused In Doctor's Rape Murder News And Updates

हैदराबाद प्रकरणातील नराधमांचा खात्मा; ज्या ठिकाणी रेप, त्याच ठिकाणी एन्काउंटर

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

हैदराबाद - पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कारप्रकरणातील चारही आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला. पोलिस तपासावेळी आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात चौघांचा मृत्यू झाला. पीडितेवर अत्याचार झालेल्या घटनास्थळी चारही आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला.  आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यात हे सर्वजण ठार झाले असा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा एन्काउंटर झाला. मिळालेल्या माहितीनुसार कोर्टात आरोपपत्र दाखल केल्यानंतर चारही आरोपींना 'सीन ऑफ क्राइम' तपासण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. मात्र त्यांच्यातील एका आरोपीने पोलिसाकडील शस्त्र घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असते तर मोठा गदारोळ झाला असता. यामुळे पोलिसांकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. 

बातम्या आणखी आहेत...