आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणात उमेदवाराने घरो-घरी जाऊन मतदारांना वाटल्या चपला; म्हणाला, निवडून आल्यानंतर काम केले नाही तर यानेच हाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यातच काही उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगळे काय करता येईल या विचारातून युक्त्या लढवत आहेत. त्यापैकीच एका अपक्ष उमेदवाराने आपल्या मतदारांना चक्क स्लिपर चपला वाटप केल्या आहेत. राज्यासह देशभर चर्चेत आलेला हा उमेदवार मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना चपला देत आहे. 


निवडून आल्यानंतर कामे केली नाहीत तर यानेच हाणा...
> येत्या 7 डिसेंबरला तेलंगणात मतदान होणार आहेत. यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी अपक्ष उमेदवार अकुला हनुमंत यांनी घरोघरी जाऊन चपलांचे वाटप केले. जगतियाल जिल्ह्यातील कोरुटला मतदार संघातून ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासोबत एक कार्यकर्ता हातात चपलांचे बॉक्स घेऊन फिरतो आणि नेताजी घरांची दारे वाजवून एक-एक मतदाराच्या हातात चप्पलच्या जोड्या ठेवतात. 
> प्रत्येक मतदाराला त्यांनी यामागचे कारण देखील सांगितले. हनुमंत म्हणतात, की कित्येक उमेदवार मतदारांना खोटी आश्वासने देऊन विसरून जातात. परंतु, आपण त्यापैकी नाहीच. निवडून आल्यानंतर मी आपली कामे करण्यात अपयशी ठरत असल्याचा निर्णय मतदारच घेतली. त्यासाठी या चपला आहेत. काम केले नाही, तेव्हा स्वतःच्या चपला खराब करण्याची गरज नाही. याच चपलांनी त्यांना मला मारण्याचा अधिकार आहे असे ते म्हणतात. 
> यासोबतच हनुमंत यांनी एक-एक आश्वासनाचे पत्र देखील दिले. या पत्रात त्यांनी आश्वसनांची यादी देताना शपथ घेतली की दिलेली आश्वासने आवश्य पूर्ण करणार आहे. कामे झाले नाहीत तर मतदारांना मला सत्तेतून बाहेर काढण्याचा आणि त्याच चपलेने मारण्याचा अधिकार आहे असे त्यांनी लिहून दिले आहे. सोशल मीडियावर हा उमेदवार व्हायरल होत आहे.

बातम्या आणखी आहेत...